जिल्ह्यातील गुटखा तस्करावर डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाची धडक कारवाई, अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मटका, गुटखा, अवैध दारू वाल्यांनी घेतला संतोष खाडे चा धसका
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सध्या जिल्ह्यात अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी धडाकेबाज कामगिरी सुरू केली आहे. मटका, गुटखा, अवैध दारू यांच्या वर कारवाई ला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धाडी टाकत अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आज जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील गुटखा विक्रेत्यावर कारवाई करत 11 लाख 5 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
आज आपल्या विशेष पोलीस पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत श्रीगोंदा घोडेगाव रोड इनामदार वस्ती जवळ एका अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पकडले असता त्या टेम्पोमध्ये 5 लाख 55,500 रुपयांचा आर एम डी, विमल गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू मिळून आली सदर इसमांची सखोल चौकशी करून गोडाऊनचा शोध घेऊन अवैध गुटख्याचा साठा तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा ते घोडेगाव जाणारे रोडवरइनामदार वस्ती जवळ रोडलगत सापळा लावला असता घोडेगाव कडून श्रीगोंदा कडे एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची कार येताना दिसली ती जवळ येताच पोलीस पथकाने इशारा करुन सदर गाडी रस्त्याच्या कडेला थांबून बातमीतील नमूद माहिती प्रमाणे सदरची गाडी सुपर कॅरी गाडी क्र. MH १६- CD- ९०५३ ही असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यातघेत चौकशी केली.
असता त्यांनी त्यांचे नावे १) रवि बबन दळवी वय ३९ रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर(चालक) २) शिवाजी लहू म्हस्के वय १९ वर्षे रा. घोडेगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर ३) नागेश निळकंठ संकरन वय-२७ वर्षे रा. रोकडोबा चौक, श्रीगोंदा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतलीअसता गाडीचे बंद बॉडी कॅबिन मध्ये अवैध गुटख्याचे पोते व बॉक्स मिळून आले. पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असतागाडीमध्ये एकूण ५,५५,६०० /- रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू, सुपारी, कात, चुना तसेच ५,५०,०००/- रु. किंमतीचीज्ञमारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी गाडी क्र. MH १६ – CD- ९०५३ असा एकूण ११,०५,६०० रुपये किंमतीचा मुद्देमालमिळून आल्याने पोलीस पथक व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचांसमक्ष प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या साठ्यामधून प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोग शाळेत विश्लेषणासाठी पाठविणे कामी वेगवेगळे केले व बाकीचा मिळून आलेला मुद्देमाल सविस्तर पंचनामा करुन जप्त केला व पुढील कार्यवाहीसाठी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. राजेश नामदेव बडे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आरोपीं विरुध्द फिर्याद देऊन खालीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.१) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६९ / २०२५ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००३ व त्याखालील निम वनियमने २०१९ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (d) (e) सह वाचन कलम३० (२) (a), ३ (१) (zz), ५९ प्रमाणे
वरील प्रमाणे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू याप्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री, उत्पादन, वाहतुकीस बंदी आहे तसेच सदर अन्न पदार्थापासून वेगवेगळ्या प्रकारचेगंभीर आजार उद्भावतात अशी बाब ज्ञात असूनही स्वत: आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्री साठाकरुन महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे ०३ आरोपींविरुध्द कारवाई करुन एकूण११,०५,६०० /- रु. किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये ५,५५,६०० /- रु. किंमतीची सुगंधी तंबाखू, सुपारी, कात, चुना तसेच५,५०,०००/- रुपये किंमतीचे ०१ चारचाकी वाहन असा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस पथकासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कारवाई करुन वरील गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे अपरपोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख,पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ दिगंबर कारखिले, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ दिनेश मोरे, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉ संभाजी बोराडे, पोकॉ जालिंदर दहिफळे, पोकॉ दिपक जाधव, पोकॉ विजय ढाकणे यांचे पथकाने केली आहे.