आषाढी एकादशी निमित्त ल.ना.होशिंग विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा संपन्न.
आषाढी एकादशीनिमित्त ल ना होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांच्या हाती टाळ मृदंग, कलश मुलींच्या डोईवर तुळशी घेऊन चालणारे सर्व वारकरी वेशातील विद्यार्थी संपूर्ण भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या भक्ती भावाने सहभागी झाले आहे.
दिंडी सोहळा या कार्यक्रमानिमित्त दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप शेठ गुगळे,सचिव अरुण शेठ चिंतामणी,संचालक दीपक होशिंग,माजी प्राचार्य अनंता खेत्रे,प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने,उपप्राचार्य युवराज भोसले,केंद्रप्रमुख राम निकम कार्यालय अधिक्षक ईश्वर कोळी उपस्थित होते.
आज सुरुवातीला सकाळच्या वातावरणामध्ये साधारणपणे दोनशे फूट उंच श्री विठ्ठलाचा टिळा भव्य प्रांगणामध्ये अतिशय आकर्षक पद्धतीने विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला.
सुरुवातीला सकाळच्या उत्साही वातावरणामध्ये भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. सर्व महिला शिक्षका यांनी अतिशय छान संस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती. सुरुवातीला घायतडक मॅडम यांनी भक्तीमय गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम छान पद्धतीने सादर केला त्यावेळी विद्यालयातील शिक्षिका रेश्मा कारंडे,सुरेखा धुमाळ, संगीता दराडे, वंदना आल्हाट, स्वाती बांगर,पूजा भालेराव, स्वप्नाली घाडगे, प्रियंका सुपेकर, नीलम काळे, शितल जगदाळे सर्व मॅडम यांनी कार्यक्रमाची तयारी केली. त्यानंतर दोनशे फूट उंचीच्या श्री विठ्ठल नामाचा टिळा विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात आला.
त्यानंतर दिंडी गावांमधून काढण्यात आली त्यावेळी छान अशी पालखी तयार करण्यात आली होती.त्याचबरोबर ट्रॅक्टरवर आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापक भरत लहाने, अनिल देडे, बबन राठोड, पोपट जगदाळे,मुकुंद राऊत, विशाल पोले,रोहित घोडेस्वार,उमाकांत कुलकर्णी,कैलास वराट,आदित्यदेशमुख, किशोर कुलकर्णी, हनुमंत वराट, साईभोसले,ज्ञस्वप्निल जाधव,राघवेंद्र धनगडे, प्रल्हाद साळुंखे,धीरज पाटील,पोपट जरे,समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.