जामखेड मध्ये हाॅटेल मालकास मारहाण प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा
हाॅटेल मधील जेवणाचे बील जास्त लावण्याच्या कारणावरून हाॅटेल मालकास सात जणांनी दगड व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन घेऊन गेले या प्रकरणी एकुण सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक दत्तू जगदाळे, अमोल जगदाळे ( पुर्ण नाव माहित नाही), अजित उर्फ दादा शहाजी जगदाळे, राजेंद्र उर्फ चाचा राळेभात, गणेश उर्फ पप्पू दत्तू जगदाळे, सुरज नामदेव जगदाळे, राहुल रामनाथ जगदाळे सर्व राहणार जगदाळे वस्ती जामखेडअसे आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अमोल बाजीराव खरात (वय ३९) रा. बीड रोड जामखेड यांचे खर्डा रोड या ठिकाणी हाॅटेल निसर्ग आहे. दि. २० जून २०२५ रोजी रात्री१०.३० वाजता आरोपी दिपक दत्तू जगदाळे व अमोल जगदाळे ( पुर्ण नाव माहित नाही)हे दोघे जण हाॅटेल मध्ये जेवण करण्यासाठी आले होते.
यानंतर ११.४० च्या सुमारास दिपक व अमोल दोघे जण फिर्यादी अमोल खरात यांच्या कडे बील देण्यासाठी आले या वेळी जेवणाचे बील देण्याच्या कारणांवरून ते फिर्यादी सोबत वाद घालू लागले. यानंतर अमोल जगदाळे यांनी हाॅटेल बाहेर येऊन इतर आरोपी साथीदारांना बोलून घेतले. यानंतर या आरोपींनी फिर्यादीस हाॅटेल बाहेर ओढत नेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी फिर्यादी चा भाऊ आनंद खरात हा सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.
या झटापटी मध्ये फिर्यादी यांच्या गळ्यातील पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गळ्यातून तुटून खाली पडली तेव्हा ती चैन अजित उर्फ दादा शहाजी जगदाळे हा उचलून घेऊन गेला. व तुमच्या कडे पाहून घेतो अशी धमकी दिली.
या प्रकरणी एकुण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे हे करत आहेत.