Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या आनंदी जीवन जगण्यासाठी नियमित योगा आवश्यक – भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद...

आनंदी जीवन जगण्यासाठी नियमित योगा आवश्यक – भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद जामखेड करांच्या आरोग्यासाठी उमेश देशमुख यांनी योग शिबीर घ्यावेत, भाजपा पदाधिकाऱ्यांची विविध ठिकाणी योग शिबीरांसाठी हजेरी

0
467

जामखेड न्युज—–

आनंदी जीवन जगण्यासाठी नियमित योगा आवश्यक – भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद

जामखेड करांच्या आरोग्यासाठी उमेश देशमुख यांनी योग शिबीर घ्यावेत, भाजपा पदाधिकाऱ्यांची विविध ठिकाणी योग शिबीरांसाठी हजेरी

नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आजच्या धकाधकीच्या काळात नियमित योगा करणे खूप महत्त्वाचे आहे. असे मत भाजपाचे शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी योग प्रात्यक्षिकादरम्यान व्यक्त केले.

श्री नागेश्वर मंदिर परिसरात संयोजक पोपट नाना राळेभात यांनी योग प्रशिक्षक उमेश काका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबीराचे आयोजन केले होते. तसेच विविध ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांची जागतिक योग दिनानिमित्त हजेरी लावत प्रात्याक्षिके केली.

यावेळी बोलताना भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद म्हणाले की, जामखेड करांच्या चांगल्या आरोग्यासाठी उमेश देशमुख यांनी शहरात योगासने शिबीर घ्यावेत.

यावेळी संजय (काका )काशीद अध्यक्ष शहर मंडल जामखेड, सोमनाथ राळेभात माजी नगराध्यक्ष, मनोज काका कुलकर्णी, संजय राऊत सर, प्रवीण शेठचोरडिया, पवन राळेभात, डॉक्टर विठ्ठल राळेभात, प्रवीण सानप, प्रवीण होळकर, ऋषिकेश मोरे, विजय कुलकर्णी, संतोष निमोणकर, राम सेठ अंदुरे, मदन कुलथे, अशोक कुलथे पाटील, दत्ता झगडे, परमेश्वर राऊत यांच्या सह अनेक पदाधिकारी हजर होते.

यावेळे उमेश काका देशमुख यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावरील आधारित पुस्तके सर्व सभासदांना दिले ल.ना.होशिंग येथे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी शिबिरात सहभाग घेतला. तसेच मोहन पवार, प्रवीण बोलभट, दिगंबर चव्हाण, अण्णासाहेब ढवळे, उमेश माळवदकर यांनी अनुक्रमे मराठी मुले मुलींचे शाळा

तपनेश्वर येथील जिल्हा परिषद शाळा लोकमान्य शाळा व ना होशिंग विद्यालय येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी योगासने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!