जामखेड येथुन वयोवृद्ध सुभाष काशिनाथ त्रिमूखे बेपत्ता आढळून आल्यास जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन

0
412

जामखेड न्युज——

जामखेड येथुन वयोवृद्ध सुभाष काशिनाथ त्रिमूखे बेपत्ता

आढळून आल्यास जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन

जामखेड येथील एका कार्यक्रमाला आलेले वयोवृद्ध सुभाष काशिनाथ त्रिमुखे वय ७८ रा. भिंगार आहील्यानगर हे काल दि २९ रोजी कार्यक्रमाच्या ठिकाणाहुन दुपारी चार वाजता निघुन गेले आहेत. या प्रकरणी त्यांची शोधाशोध करुन देखील ते मिळुन आले नाहीत.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत कोणाला आढळून आल्यास 9881008199 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथुन वयोवृद्ध सुभाष काशीनाथ त्रिमुखे वय-78 वर्षें रा. देवनगरी नागरदेवळे भिंगार. जि. अहिल्यानगर हे त्याची पत्नी सौ. सुशीला सुभाष त्रिमुखे यांचे सोबत जामखेड येथे त्यांचे नातेवाईक शंकर मधुकर इंगळे रा. जामखेड यांच्याकडे एका कार्यक्रमासाठी आले होते.
कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 4 वा. च्या सुमारास जेवण झाल्यावर आरोळे वस्ती भागातुन वयोवृद्ध सुभाष काशीनाथ त्रिमुखे हे कोणास काही न सांगता कोठेतरी निघुन गेले. यानंतर ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जामखेड परीसरात त्यांची शोधा शोध केली मात्र ते कोठेच आढळुन आले नाहीत.

या प्रकरणी नातेवाईक रमेश काशीनाथ त्रिमुखे वय-68 वर्षे धंदा- सेवानिवृत्त रा. नवजीयन कॉलनी मार्केटयार्ड, अहिल्यानगर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आसुन कोणाला सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास जामखेड पोलीस स्टेशन व रमेश त्रिमुखे यांच्या मो. 9881008199 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.
त्यांचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
वर्णन – 1) संपूर्ण नाव- सुभाष काशीनाथ त्रिमूखे वय- 78 वर्ष रा.देवनगरी नागरदेवळेभिगांर ता.जि. अहिल्यनगर ,रंगाने- सावळा , 2) उंची- 5 फूट 00 इंच, 3) केस- पांढरे 4) चेहरा- गोल 5) बांधा- सडपातळ, 6) नाक- सरळ, 7) डोळे- काळे पेहराव -1) शर्ट-पांढरा रंगाची 2) पॅन्ट- पांढरी रंगाची पॅन्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here