Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत खर्डा येथे...

कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत खर्डा येथे दाखल

0
258

जामखेड न्युज——

कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवणार,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत खर्डा येथे दाखल

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दाखल झाले आहेत. २४ आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविले जाणार आहेत.

कृषिदूतांनी खर्डा ग्रामपंचायतीस भेट दिली, यावेळी सरपंच सौ. संजीवनी वैजिनाथ पाटील, उपसरपंच सौ. शितल सुग्रीव भोसले, सदस्य राजू मोरे, वैभव जामकावळे, महेश दिंडोरे व इतर ग्रामस्थांनी कृषिदुतांचे स्वागत केले.

कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो, या दरम्यान विद्यार्थ्यांना दिलेल्या भागातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांचे जीवनमान, त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती, ई-पिक पाहणी अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा आहेत, या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग, व्यवसाय व इतर हवामान विषयी जास्तीत जास्त माहिती विविध ॲप द्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत विद्यार्थी गावात मार्गदर्शन करणार आहेत. कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषिदूत कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख प्रा. पोपट पवार, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. नजिर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास मेहेत्रे व इतर विषय विशेषतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमातून महाविद्यालयाचे कृषिदूत संकेत मोहळकर, शिवम महाडिक, परिक्षीत खटके आणि संकेत काशीद मार्गदर्शन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!