Home ताज्या बातम्या रक्तदानातून वाढदिवसाचा अनोखा संकल्प! २२ वर्षांपासून मयूर भोसले सरांचा समाजसेवेचा अखंड उपक्रम...

रक्तदानातून वाढदिवसाचा अनोखा संकल्प! २२ वर्षांपासून मयूर भोसले सरांचा समाजसेवेचा अखंड उपक्रम वाढदिवशी रक्तदान करून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश, विविध उपक्रमांतून जामखेडच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख

0
4
रक्तदानातून वाढदिवसाचा अनोखा संकल्प! २२ वर्षांपासून मयूर भोसले सरांचा समाजसेवेचा अखंड उपक्रम   वाढदिवशी रक्तदान करून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश, विविध उपक्रमांतून जामखेडच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख

जामखेड न्युज – – – – – 

रक्तदानातून वाढदिवसाचा अनोखा संकल्प! २२ वर्षांपासून मयूर भोसले सरांचा समाजसेवेचा अखंड उपक्रम

वाढदिवशी रक्तदान करून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश, विविध उपक्रमांतून जामखेडच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख

वाढदिवस म्हटला की केक कापून, शुभेच्छांचा वर्षाव आणि आनंदोत्सव असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करून एखाद्याचे जीवन वाचविण्यास हातभार लावण्याचा संकल्प गेल्या २२ वर्षांपासून जपणारे श्री नागेश विद्यालयाचे उपक्रमशील कला शिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी समाजासमोर आगळा आदर्श निर्माण केला आहे.

जामखेड शहरातील प्रसिद्ध डॉ. कै. द. भ. खैरनार (दादा) यांच्या जयंतीनिमित्त कै. डॉ. द. भ. खैरनार फाउंडेशनच्या वतीने आज सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मयूर भोसले सरांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला.  नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांबरोबर नेहमी वेगवेगळ्या रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यात अग्रेसर असतात. 

गेल्या २२ वर्षांपासून वाढदिवशी रक्तदान करण्याची त्यांची परंपरा यंदाही कायम राहिली. मयूर भोसले हे केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर कला, एनसीसी, सामाजिक कार्य आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आणि शिस्तीची भावना निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य ७५ मीटर तिरंगा रॅलीने जामखेडकरांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच २६ जानेवारीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विशिष्ट पद्धतीने उभे करून तयार करण्यात आलेल्या भव्य नकाशाच्या उपक्रमातूनही त्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणली. जामखेड तालुक्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या माध्यमातून जागतिक पातळीवर चमकवले 

त्यांच्या विविध उपक्रमांमुळे अनेक विक्रमांची नोंद झाली असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला आहे.

रक्तदान, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम त्यांच्या उपक्रमांमधून पाहायला मिळतो. स्वतःच्या वाढदिवसाला समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची ही २२ वर्षांची परंपरा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

मयूर भोसले सरांच्या या उपक्रमाचे सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतून कौतुक होत असून, ‘वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता तो समाजासाठी उपयोगी ठरवावा’, असा संदेश त्यांच्या कृतीतून मिळत आहे. आज विविध ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, राजकीय पदाधिकारी यांनी मयुर भोसले यांचा सन्मान केला. 

— संपादक सुदाम वराट, जामखेड न्यूज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!