जामखेड न्युज——
गॅस एजन्सीतील गाडीच्या बॅटऱ्या चोरणारा अरोपी एका तासात जेरबंद !
जामखेड पोलीसांची दमदार कामगिरी
भारत गॅस एजन्सी आरोळे दवाखान्याच्या पाठीमागे गॅस एजन्सी मधील गाडीच्या बॅटऱ्या आज्ञात चोराने चोरी गेल्याची फिर्याद सुरज बाळासाहेब पोकळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
त्यानुसार भारत गॅस एजन्सी गोडाऊन येथे महेंद्र जितो कंपनीची गाडी क्रमांक MH-16 – CD-28 12 या गाडीचे बॅटरी चोरी गेली आहे. तसेच दुसरे गाडी महेंद्र जितो गाडी क्रमांक MH-16CD 2805 हिची पण अँमेरॉन कंपनीची बॅटरी चोरी गेली आहे.
अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्यानुसार जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या आदेशाने पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांनी चौकशी केली असता त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्या ठिकाणी त्यांना अज्ञात इसमाला संशयित म्हणून ताब्यात घेतले.