जामखेड न्युज——
आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये २१ फेब्रुवारी रोजी मेगा- प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या
चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पस मार्फत विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
सोबतच महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवत करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत.
यातीलच एक भाग म्हणून दि .२१ फेब्रुवारी २०२४ रोजी बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए., बी.सी.ए., बी. एस्सी., बी.सी. एस. इत्यादी कोर्सच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकणाऱ्या व एम. बी. ए. किंवा एल.एल.बी. किंवा बी.एड चा CET फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मेगा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
या ड्राईव्हमध्ये आय. सी. आय. सी. आय. ग्रुप, जस्टडायल, टेलिमॅक्स, एअरटेल, एच.डी.एफ.सी. बँक, एशियन ग्रुप, समृद्धी इन्फोटेक, सेव्हन सेन्स, टाटा स्ट्राइव्ह, आ.य.डी.एफ. सी., तिरुमला ग्रुप, यशस्वी ग्रुप इत्यादी बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत अशी माहिती आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर व प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी दिली.
तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी https://forms.gle/8asDqvCmmLRrGMTUA या लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.