जामखेड न्युज——
स्टार अकॅडमी च्या वतीने” टॅलेंट सर्च परीक्षा” चे आयोजन
स्टार अकॅडमी ‘मुकुंद नगर. अहमदनगर. संस्थापक इंजि. शेख असीम गफार यांच्या संकल्पनेतून STSE स्टार टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये इयत्ता 10 मधून प्रथम क्र कैफ मंजर अली सय्यद (आर्मी पब्लिक स्कूल) द्वितीय क्. अली अकबर बहलूली (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट) तृतीय क्र मरियम इनामुल्लाह खान (सेंट विवेकानंद हाय स्कूल) इयत्ता 9 वी तून मोहम्मद आफ्फान अन्सर शेख (पी ए इनामदार स्कूल) द्वितीय क्र -शेख अबुजर मुदस्सर (पी ए इनामदार स्कूल ) तृतीय क्र सय्यद हमजा शाहनवाज (पी ए इनामदार स्कूल ) हे
विजयाचे मानकरी ठरले.
चांद सुलताना हाय स्कूल ने सांघिक प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्यांना मान. सय्यद वसीम अन्वर, प्रशासकीय अधिकारी वर्ग (एक) वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग यांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात अशा स्पर्धात्मक परीक्षांची समाजात नेमकी गरज ओळखून या
स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल “स्टार अकॅडमी” संस्थेचे कौतुक करण्यात आले.
इयत्ता नववी, दहावी सेमी इंग्रजी विद्यार्थी गणित, शास्त्र, इंग्रजी व इतर अभ्यासक्रमावर ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम तीन विजेत्यास रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ बक्षीसे व सर्व परीक्षार्थी करिता सहभाग प्रमाणपत्र असे भरपूर
बक्षिसे वाटप करण्यात आली. या स्वरूपाची प्रथमच पर्वाची स्पर्धा असतानाही शहरातील २० हुन अधिक शाळांनी व वैयक्तिक 150 हुन अधिक असा विद्यार्थ्यांनी प्रचंड सहभाग नोंदविला अक्षरशः नोंदणी थांबविण्यात आली.
परीक्षा व त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात निकाल स्वादिष्ट अल्पोपहार व पारितोषिक वितरण समारंभ वेळेचे काटेकोर पालन सूत्रबद्ध करण्यात
आले.
संचालक प्रा. पठाण अरबाज यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते अॅड गफ्फार शेख यांनी मनोगत रुपी शुभाशीर्वाद दिले, प्रा. बशीर पठाण यांनी आभार मानले. जोरदार सूत्र संचालन इंजि. शेख असीम यांनी केले डिजिटल
, सोशल मीडिया पद्धतीचा वापर, वेळेत, शिस्तबद्ध व नियोजन पद्धतीने घेतलेल्या या स्पर्धेचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांकरिता अशा स्पर्धेचे नियोजन वारंवार करण्यात यावे अशी गरजही नमूद केली.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहसंचालक, प्रा. अर्शद पठाण. प्रा. उज्वल तुपे. प्रा. शेख झेबा प्रा जिक्रिया मॅडम, शेख अबुजर, खान राजिक, शेख परवेज, तांबोळी दानिश, अझहर काझी, सिद्दिक काझी, खान अली, सोहम तुपे, ओंकार काळे, स्पर्धा यशस्वी करिता आदींनी परिश्रम घेतले तर प्रा. शशिकांत गाडे, मान खान समद वहाब मा. नगरसेवक, प्रा. सिराज सर, प्रा. हारुण सर, प्रा. समी सर. प्रा. लवांडे श्रीमती शेख करिष्मा. सौ. शेख इशरत ज्येष्ठ समाजसेवक प्रा. बशीर सर. प्रा. शहा दिलावर, नासिर पठाण, ॲड.सय्यद नदीम. ओंकार काळे, अॅड. सय्यद बहेजाद शेख आयुब अहमद खान अब्रार बशीर मेंबर, सय्यद परवेज, मुन्ना सर, संस्थेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.