जीवनात प्रगतीसाठी अभ्यासाबरोबर खेळाचा सराव आवश्यक – पीएसआय गायत्री राळेभात तायक्वांदो खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण

0
311

जामखेड न्युज——

जीवनात प्रगतीसाठी अभ्यासाबरोबर खेळाचा सराव आवश्यक – पीएसआय गायत्री राळेभात

तायक्वांदो खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण

 


कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर शरीर निरोगी असले पाहिजे व शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोणता ना कोणता खेळ आपण खेळला पाहिजे. मला जे यश प्राप्त झाले ते मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळेच. त्यामुळे तुम्हीही सतत सराव करा व खेळाबरोबरच अभ्यास करून माझ्यासारखे यश तुम्हीही संपादन करू शकता. असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या गायत्री भूषण राळेभात यांनी केले.

गायत्री राळेभात यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. जामखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या प्रांगणात असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात हा सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव राळेभात, भूषण राळेभात, योगेश गायतडक, संदीप ठोंबरे, पत्रकार संजय वारभोग, पत्रकार धनराज पवार, तायक्वांदो प्रशिक्षक तथा जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे, सौ सविता बारगजे उपस्थित होते.

यावेळी कलर बेल्ट परीक्षेत यश संपादन केलेल्या खेळाडूंना अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने गायत्री राळेभात व मान्यवरांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या बेल्ट परीक्षेत पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

रेड बेल्ट – सिद्धी सांगळे
ब्ल्यू वन बेल्ट – सानिका नागरगोजे,
ब्ल्यू बेल्ट – समाधान सदाफुले
ग्रीन वन बेल्ट – आदर्श समिंदर व तेजश्री सांगळे
ग्रीन बेल्ट – प्राची दत्तात्रय माने, शिवराज योगेश येवले, शिवतेज योगेश येवले, स्वराज प्रदीप जायभाये, अविनाश योगेश कानडे, ओम महेश येवले

येलो बेल्ट – विद्या मुरूमकर, गायत्री येवले, अनन्या नागरगोजे, देवराज नागरगोजे, अविष्कार निंबाळकर, आदर्श जगदाळे, ओम संदीप ठोंबरे, श्लोक महेश वारे, मोहम्मद साद शेख, आदिनाथ सांगळे, प्रितेश शिरसाठ

या सर्व खेळाडूंचे अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सहसचिव अलताफ कडकाले, दत्तात्रय उदारे सर संजय बेरड आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here