स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांकासाठी जामखेड नगरपरिषद सज्ज पथनाट्य भारुड कार्यक्रमाद्वारे जनजागृती

0
209

जामखेड न्युज——

स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांकासाठी जामखेड नगरपरिषद सज्ज

पथनाट्य भारुड कार्यक्रमाद्वारे जनजागृती

 

स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी तसेच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटवण्यासाठी जामखेड नगरपरिषद सज्ज झाली असून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 निमित्ताने पथनाट्य भारुड कार्यक्रम श्री नागेश विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये गणेश वंदना घेऊन नाटक सुरवात केली ओला कचरा ,सुका कचरा तसेच घातक कचऱ्याचे वर्गीकरण नाटके द्वारे सादरीकरण केले.


घातक कचऱ्याचे सविस्तर वर्गीकरण सांगितले
झाडे लावा झाडे जगवा तसेच झाडाविषयी घ्यायची काळजी कशी ठेवावी, सर्व विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभागीय संपूर्ण जामखेड शहर स्वच्छ करून या स्पर्धेत जामखेडचा एक नंबर आला पाहिजे असेल मार्गदर्शन नाटिके द्वारे केले. गायन, भारुड ,गोंधळ गीत ,नाटिका यांचे सादरीकरण केले.

जामखेड परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये विविध स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आले.

जामखेड शहरामध्ये वासुदेवाने सकाळ जनजागृती करून सर्व नागरिक रास स्वच्छता सर्वेक्षण मध्ये सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले व नागेश चौक, खर्डा चौक तहसील कार्यालय चौक ,या ठिकाणी जनजागृती पथनाट्य सादर केली.

रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ,कन्या विद्यालय, लोकमान्य शाळा , ल ना विद्यालय जामखेड महाविद्यालय या ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले


जामखेड शहर समन्वयक तुषार केवडे, प्राचार्य मडके बी,के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,संभाजी इंगळे साळुंखे बी एस ,रघुनाथ मोहळकर , एनसीसी ऑफिसर मयुर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते ज्ञानराज कलामंच कोरेगाव सातारा चे कलाकार श्रीनिवास बरादे अभिजीत पवार पार्थ वंजारी ,प्रतीक जाधव ,प्रशांत घोडके ,श्रीधर लोंढे ,सचिन महाजन ,प्रसाद महाराज पवार, आधी कलाकारांनी नाटक भारुड सादरीकरण केले.

विद्यालयाचे वतीने या कलाकारांचे सत्कार करण्यात आला.
प्राचार्य मडके बी के यांनी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आमचे विद्यालय नेहमीच अग्रेसर राहणार आहे आणि विद्यार्थी पालक शिक्षक याद्वारे जनजागृती करून आपला परिसर स्वच्छ करणार व जामखेडला सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक आणण्यासाठी प्रयत्न करणार असे मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here