जामखेड न्युज——
नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार सामना रंगणार ? राणी लंके यांचीही शिवस्वराज्य यात्रा सुरू
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नगर दक्षिण लोकसभेसाठी विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना काही प्रमाणात पक्षातून विरोध होत आहे तरीही तेच लोकसभेचे उमेदवार राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या विरोधात पारनेरचे आमदार निलेश लंके रणनीती आखात आहेत. पण अजित पवार गट भाजपासोबत असल्याने उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसते काल दिल्लीत झालेल्या बैठकीत सुजय विखे विरोधात आमदार रोहित पवार यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता विखे विरोधात पवार असा सामना रंगणार अशी चिन्हे दिसत आहेत.
रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद माजी सदस्य राणी लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत आपण किंवा पती आमदार लंके निवडणूक लढवणारच असा मनसुबा जाहीर करत, मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.
खासदार डॉ सुजय विखे यांना पक्षांतर्गत विरोध झाल्यास आमदार प्रा राम शिंदे यांचे नाव पुढे येऊ शकते. तसेच सध्या आमदार निलेश लंके यांनीही दक्षिण मतदारसंघाच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत. लवकरच कळेल की, कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल व कोणाकोणाला उमेदवारी मिळेल.
एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shivsena Ineligible case) निकालावर सर्वांचं लक्ष असताना आता दिल्लीत मोठ्या हलचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election Seat Allocation) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सत्ता समिकरण (Maharastra Politics) कसं असेल? यावर चर्चेला उधाण आलं होतं. अनेक अंदाज देखील लावले जात होते. अशातच आता दिल्लीतून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी लोकसभेच्या 14 जागांवर लढणार असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने 14 जागेवर दावा केल्याची माहिती समोर आलीये. तर रायगड लोकसभा उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याचं देखील समजतंय. त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही असताना मावळ जागेवरील हक्क सोडणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. तर रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची गुप्त बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतची चर्चा झाल्याची माहिती मिळालीये.
दरम्यान, लोकसभेच्या 23 जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. राज्यात 48 जागांची चाचपणी केल्यानंतरच आम्ही 23 जागांवर दावा केल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय. तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात अडचण नाही. मात्र, एक दोन जागांसंदर्भातला तिढा वरिष्ठ नेते सोडवतील. त्यामुळे जागावाटपासंदर्भात कोणतीही अडचण येणार नसल्याचं राऊतांनी म्हटलंय.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी दोन महिन्यांत जिल्ह्यामध्ये बूथ कमिट्यांची स्थापना करण्याची सूचना शरद पवार यांनी दिल्या. त्यामुळे आता बीडमध्ये शरद पवार कोणता गेम खेळणार? यावर सर्वांच्या नजरा आहेत.