मोहा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भिमराव कापसे बिनविरोध कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या वतीने सत्कार

0
589

जामखेड न्युज——

मोहा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी भिमराव कापसे बिनविरोध

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या वतीने सत्कार

 

जामखेड तालुक्यातील महत्त्वाची मानली जाणारी मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी व पांडववस्ती या गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीचे भिमराव कापसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


मोहा ग्रृप ग्रामपंचायतीची गेल्या अडीच वर्षापुर्वी निवडणूक झाली होती. या मध्ये शिवाजी डोंगरे यांची सर्व सदस्यांच्या सहमतीने बिनविरोध निवड झाली होती. या निवडणुकीत शिवाजी डोंगरे यांनी आपला अडीच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला होता. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्द पाळुन आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता . शिवाजी डोंगरे यांनी दिलेला शब्द पाळुन नवनिर्वाचित सरपंच भिमराव कापसे यांना ठरल्या प्रमाणे आज रोजी सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या साक्षीने त्यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने आज सोमवार दि ९ ऑक्टोबर रोजी भिमराव कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांनी त्यांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढली होती. नंतर उपसभापती कैलास वराट यांनी नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार केला.


यावेळी नवनिर्वाचित सरपंच भिमराव कापसे आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की मी गेल्या अडीच वर्षांत कर्जत जामखेडचे आमदार रोहित (दादा) पवार यांनी विषेश लक्ष घालून विविध विकास कामांना भरपूर नीधी दिला आसुन या पुढेही आ. रोहित (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली मोह ग्रृप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी व पांडववस्ती या गावांचा विकास करणार आहे.

निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साकत मंडल अधिकारी अभिमन्यू शिरसाठ, तलाठी प्रशांत जमदाडे, ग्रामसेवक प्रशांत सातपुते, यांनी काम पाहिले. या वेळी ग्रामपंचायत माजी सरपंच शिवाजी डोंगरे, वामन डोंगरे, विकास सांगळे, पंडित गायकवाड, वसंत झेंडे, पांडुरंग देडे, विनोद इंगळे, तसेच रावसाहेब रेडे, नामदेव घुमरे, हापटे सर, प्रमोद देडे, दासु रेडे, वैभव गायकवाड, बाबासाहेब डोंगरे, बाप्पु डोंगरे, कुंडल डोंगरे, जयसिंग हापटे, दिनकर भीसे, सतिश इंगळे, शिवाजी कापसे, दिलीप देडे सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here