मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील ६ आँक्टोबर रोजी जामखेडमध्ये सभेच्या नियोजनासाठी २९ सप्टेंबर रोजी नियोजन बैठक

0
580

जामखेड न्युज——

मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील ६ आँक्टोबर रोजी जामखेडमध्ये

सभेच्या नियोजनासाठी २९ सप्टेंबर रोजी नियोजन बैठक

 

मराठा आरक्षणासाठी 17 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दंड थोपटण्याची तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यानुसार शुक्रवार ६ आँक्टोबर रोजी जामखेड जाहीर सभा होणार आहे अशी माहिती आयोजकांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.


मनोज जरांगे यांची दि. ६ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा होणार असून सदर सभेच्या नियोजनासाठी दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. जामखेड येथे बैठक आयोजित केली आहे. साई मंगल कार्यालय, नगर रोड, जामखेड येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले होते. तब्बल १७ दिवसानंतर सरकारच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण जरांगे पाटील यांनी घेतले. यावेळी त्यांनी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला होता. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला या मुदतीची आठवण करुन द्यावी लागेल, असे म्हणत पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.

महाराष्ट्र दौरा…

मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी ३० सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यासह नगर, नाशिकचा दौरा करून 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. जामखेड येथे ६ आँक्टोबर रोजी जाहीर सभा होणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here