जामखेड न्युज——
शेतकऱ्यांचे खरे नेते जगन्नाथ (तात्या) राळेभात होते – खासदार डॉ. सुजय विखे पाटील
सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
ग्रामीण भागात राहूनही जिल्ह्य़ात राजकीय क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवलेले, आणि सदैव गरीबांच्या व शेतकर्यांच्या मदतीसाठी तत्पर धावुन जाणारे आसे व्यक्तीमत्व स्व. जगन्नाथ (तात्या) राळेभात पाटील यांचे होते. तात्यांचे कार्य व योगदान समाज्यासाठी मोलाचे आणि इतरांना प्रेरणादायी होते. असे मत खा. सुजय (दादा) विखे यांनी प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील गोरगरीब शेतकर्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सहकार महर्षी स्व.जगन्नाथ (तात्या )देवराव राळेभात पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने दोन दिवस कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्व. जगन्नाथ (तात्या) राळेभात यांना श्रध्दांजली समर्पित करण्यासाठी जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रातील आनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार पवार, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व माजी आ. शिवाजी कर्डिले, आमदार प्रा.राम शिंदे, ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, माजी आ. राहुल जगताप, जिल्हा बँकेचे संचालक नारायण दादा ससाणे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आ. साहेबराव दरेकर, माजी चेअरमन व संचालक सिताराम गायकर, जिल्हा सहकारी बँकेचे अंबादास पिसाळ, संचालक काकासाहेब तापकीर, मा. जिल्हा परिषद सदस्य कैलास शेवाळे, राजेंद्र गुंड, आशोक खेडकर, प्रा. मधुकर राळेभात, दादासाहेब सोनमाळी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मला खासदार करण्यात तात्यांचे योगदान खुप मोठे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्या नेहमीच पुढे असत.
आमदार रोहित पवार यांनी श्रध्दांजली समर्पित करताना सांगितले की जिरायती भागातील नेतृत्व कसे करायचे हे तात्यांकडुन शिकले पाहिजे. आजही तात्यांचे संस्कार तात्यांनी त्यांच्या मुलांना दिले आहेत ते पुढे जोपासण्याचे काम सुधीर आणि अमोल ही त्यांची दोन्ही मुले करत आहेत. जगन्नाथ तात्यांन बद्दल बोलायचे झाले तर मला निवडुन आणण्यात तात्यांचा खुप मोठा वाटा आहे. गरीबांचे व शेतकर्यांना मदत करण्याचे दातृत्व व नेतृत्व तात्यांकडे होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सुधिर राळेभात यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की जे तात्यांनी कमवले आहे तो वारसा आम्ही दोघे भाऊ पुढे घेऊन जाणार आहोत. आजच्या तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा कार्यक्रमाला सर्व राजकीय सामाजिक ,शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक सोसायटीचे सर्व चेअरमन व सदस्य सरपंच व सदस्या व जिल्हा बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहीले त्या बद्दल जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधिर राळेभात यांनी उपस्थित सर्व मान्य वरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प निकम महाराज यांनी केले.