महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या पशुधन विकास अधिकारीपदी (वर्ग-१) परिक्षेत ओबीसी प्रवर्गात डॉ. दिपाली पठाडे राज्यात नववी

0
523

जामखेड न्युज——

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या पशुधन विकास अधिकारीपदी (वर्ग-१) परिक्षेत ओबीसी प्रवर्गात डॉ. दिपाली पठाडे राज्यात नववी

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत जामखेड तालुक्यातील जवळा येथील कन्या डाॅ.दिपाली सुरेश पठाडे यांची पशुधन विकास अधिकारी (वर्ग-१) पदी निवड झाली आहे. पठाडे या ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात नवव्या आल्या आहेत.

डाॅ.दिपाली सुरेश पठाडे यांचे प्राथमिक शिक्षण इंदौर येथील शारदा रामकृष्ण विद्यामंदिर येथे झाले.माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात,उच्च माध्यमिक शिक्षण कर्जत येथील दादा पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. नागपुर येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयात पदवी मिळवल्यानंतर, परभणीच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात पॅथालाजी डिपार्टमेंट या याविषयात पदवीत्तर शिक्षण पुर्ण केले. यादरम्यान डाॅ.दिपाली पठाडे यांनी स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास सूरू केला होता.डाॅ.दिपाली पठाडे या जवळा सेवा संस्थेचे माजी चेअरमन सुरेश पठाडे यांच्या जेष्ठ कन्या आहेत.

या यशाबद्दल डाॅ.दिपाली पठाडे यांचे आमदार प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार , ज्योतीक्रांती मल्टीटेटचे चेअरमन आजीनाथ हजारे, माजी उपसभापती दिपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे ,जवळा सेवा संस्थेचे चेअरमन शहाजी पाटील, माजी सभापती सुभाष आव्हाड, माजी सरपंच प्रदिप दळवी, डाॅ.महादेव पवार , संतराम सूळ , डाॅ.दिपक वाळुंजकर, प्रशांत पाटील, राजेंद्र महाजण, विकीशेठ मंडलेचा , कल्याण रोडे, रफीक शेख, अरूण लेकुरवाळे,भास्कर रोडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

चौकट –

लॅबोरटरी ॲनिमल्स मध्ये संशोधन.
———————————————
डाॅ.दिपाली पठाडे यांनी परभणी येथे पदवीत्तर शिक्षण घेताना पॅथालाजी डिपार्टमेंटमध्ये ‘ लॅबोरटरी ॲनिमल्स ‘ मध्ये संधोशन केले आहे. त्यांचा संशोधन पेपर प्रकाशित झाला आहे.

फोटो – डाॅ.दिपाली पठाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here