श्रीकृष्ण वराट यांच्या एमपीएससी तील यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत येथे सत्कार संपन्न माजी विद्यार्थी माझा अभिमान

0
94

जामखेड न्युज——

श्रीकृष्ण वराट यांच्या एमपीएससी तील यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत येथे सत्कार संपन्न

माजी विद्यार्थी माझा अभिमान

 

 

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा साकत शाळेत माजी विद्यार्थी श्रीकृष्ण हनुमंत वराट यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत सहाय्यक विक्रीकर निरीक्षक (STI) पदी नेमणूक झाल्यामुळे तसेच तो शाळेचा माजी विद्यार्थी आहे. यामुळे शाळेमध्ये गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक वैजनाथ गीते यांनी भूषवले. अध्यक्षांची निवड श्रीमती वराट मॅडम यांनी केली तर अनुमोदन श्रीमती निगुडे मॅडम यांनी दिले.

या कार्यक्रमासाठी राजेंद्र वराट (उपसरपंच), गणेश वराट (शा व्य स अध्यक्ष) तसेच अनेक पालक उपस्थित होते.शाळेच्या वतीने सत्कारमूर्ती श्री कृष्णा हनुमंत वराट यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कृष्णा वराट यांनी जे यश मिळवले त्याची थोडक्यात यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली.

अपयशाला खचून न जाता प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गिते सर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जेधे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मिसाळ सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम खंडागळे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here