जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यातील सांगवी येथे शेतीच्या वादावरून झालेल्या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी
जामखेड तालुक्यातील सांगवी येथे शेतीच्या वादाच्या व शेतात गुरे बांधण्याच्या कारणावरून सात जणांनी कुऱ्हाड, लोंखडी गज, लाकडी काठी यांनी केलेल्या मारहाणीत फिर्यादीसह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून आरोपींविरुद्ध खुणाच्या प्रयत्नाबरोरबच इतरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील सांगवी येथे दि. २० आँगस्ट रोजी सकाळी सात वाजताचे सुमारास यातील आरोपी भागवत दिगांबर महारनवर, संजय दिगांबर महारनवर, वैभव भागवत महारनवर, योगेश संजय महारनवर, राम कुवर भागवत महारनवर, उर्मिला संजय महारनवर, सुशिला डिगांबर महारनवर सर्व रा.सांगवी यांनी संगनमत करुन तीन एकर शेतीचे वादातुन तसेच ‘जनावरे बांधल्याचे कारणावरून यातील फिर्यादी महादेव जालींदर महारनवर (वय ४३) सह फिर्यादीचे वडील जालिंदर महारनवर, आई- इंदूबाई, भावजय अलका महारनवर, मुलगा विशाल महारनवर यांना लोखंडी गजाने, लाकडी काठीने, कुऱ्हाडीने मारहाण व शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही मारहाण जीवे ठार मारण्याचे उद्देशाने करून गंभीर जखमी केले.
यानुसार यातील जखमी हे जामखेड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सरोदे यांनी सदर हाॅस्पिटलला जाऊन फिर्यादी महादेव जालींदर महारनवर (वय ४३) धंदा-शेती यांच्या जबाबावरुन दिलेल्या दाखल फिर्यादीवरून आरोपी भागवत दिगांबर महारनवर 2) संजय दिगांबर महारनवर 3) वैभव भागवत महारनवर 4) योगेश संजय महारनवर 5) राम कुवर भागवत महारनवर 6) उर्मिला संजय महारनवर 7) सुशिला डिगांबर महारनवर सर्व रा.सांगवी ता. जामखेड यांचे विरुद्ध गु.रजी. न. व कलम 392/2023 भा.द.वि कलम 307, 143, 147,148,149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत.