जामखेड न्युज——
भुतवडा येथील चार शेतकरी पुत्र झाले पोलीस भरती
जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर तालुक्यातील भुतवडा येथील चार शेतकरी पुत्र पोलीस भरती झाले आहेत. कोठेही अँकॅडमी जाँइन न करता घरीच तयारी करत पोलीस भरती झाले आहेत यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. सुशिक्षित तरुणांनी हा आदर्श घेत आपले करिअर घडवावे.
तालुक्यातील भुतवडा येथील
१) आबासाहेब डोके (पिंपरी चिंचवड पोलीस)
२) आस्तिक डोके (नांदेड पोलीस)
३) योगेश पळसे (पुणे ग्रामीण पोलीस)
४) बाबा मोरे (मुंबई पोलीस)
या चार तरूणांची पोलीसांत भरती झाली आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आबासाहेब डोके यांचे पहिली ते चौथी शिक्षण भुतवडा येथे, पाचवी ते बारावी नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड तर बीए जामखेड महाविद्यालय जामखेड येथे झाले आहे.
आस्तिक डोके यांचे पहिली ते चौथी शिक्षण भुतवडा तर पाचवी ते दहावी मोहा येथे अकरावी बारावी ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड बीए जामखेड महाविद्यालय जामखेड येथे
योगेश पळसे पहिली ते चौथी शिक्षण पांडववस्ती पाचवी ते बारावी नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड बीए जामखेड महाविद्यालय जामखेड
बाबा मोरे पहिली ते चौथी पांडववस्ती पाचवी ते बारावी नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड तर बीए जामखेड महाविद्यालय जामखेड येथे झाले आहे.
वरील चारही जणांनी कोणत्याही अँकँडमी न जाता शिवनेरी अँकँडमी शेजारी मैदानावर स्वत: सराव केला व यश मिळवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांसमोर हा एक आदर्श आहे.
वरील चारही पोलीस पदी निवड झालेल्या यशस्वी उमेदवाराचे अभिनंदन कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, जामखेड महाविद्यालयाचे डॉ. प्राचार्य डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, मंगेश (दादा) आजबे यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.