जामखेड न्युज—–
वसंत (आण्णा) वराट यांचे हृदयविकाराने निधन
साकत येथील प्रगतशील शेतकरी वसंत तुकाराम वराट (वय ६०) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आज दुपारी चार वाजता साकत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वसंत वराट यांना चार मुले एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांचा मुलगा बाजीराव वराट यांची नगर येथे नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था आहे. या माध्यमातून अनेक बालकांना सुसंस्कारित करण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
वसंत वराट यांना वस्ताद नावाने ओळखले जात होते. साकत येथील भव्य दिव्य हगामा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक सामाजिक कार्यात ते नेहमीच आघाडीवर असत. रात्री अचानक छातीत दुखु लागल्याने त्यांना नगर येथील हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यांच्या मागे पत्नी चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.