जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांनी हेल्दी व तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी कसलाही ताणतणाव घेऊ नये यासाठी परीक्षार्थींचे प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पहिला पेपर सुरळीत पार पडला अशी माहिती केंद्रसंचालक पोपट जरे यांनी दिली.

प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी केंद्र संचालक पोपट जरे, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ, पर्यवेक्षक बी. ए. पारखे, कार्यालयीन अधीक्षक ईश्वर कोळी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताणतणाव न घेता सर्व विद्यार्थ्यांनी हेल्दी व तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी या विद्यार्थ्यांची कोरोना काळात दहावीची परीक्षा झालेली नाही आता बारावीची परीक्षा देत आहेत. त्यांची बारकोड व होलोक्राफ्ट लावताना अडचण होऊ नये म्हणून शाळेत कार्यशाळा घेण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रवेशद्वारावर उभे राहून फक्त परीक्षार्थीं मुलांना लेखन साहित्य व पँड घेऊन प्रवेश दिला पालकांना प्रवेश दिला नाही. ल. ना. होशिंग परीक्षा केंद्रावर 755 परिक्षार्थी प्रविष्ट झालेले आहेत. सर्व पर्यवेक्षक पोलीस प्रशासन व शिक्षण विभागाचे चांगले सहकार्य लाभले असे केंद्र संचालक पोपट जरे यांनी सांगितले. पहिला पेपर शांततेत संपन्न झाला.



