जामखेड न्युज—–
संध्या सोनवणे आयोजित सुरेखा पुणेकरांच्या उपस्थितीत नायगाव महोत्सव उत्साहात साजरा
शिवजयंती आणि नायगाव ग्रामदैवत नाथ महाराज यात्रे निमित्ताने प्रथमच ‘नायगाव महोत्सवाचे ‘आयोजन कु.संध्या सोनवणे (ग्रामपंचायत सदस्य) केले होते. तुफान गर्दीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा झाला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि अतिशय गाजलेले गाणे पाव्हणं जेवलात काय ? फेम पार्श्वगायिका राधा खुडे यांच्या अप्रतिम कलेचा आविष्कार सादर केला.

कार्यक्रमासाठी महिलांची मोठया प्रमाणात गर्दी होती. महिलांनी उपस्थित राहून मनमुराद आनंद घेतला.

यावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, खर्डा पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, संजय बाप्पू बेरड, शिऊर सरपंच गौतम उतेकर,नरेन्द्र पाचारे, युवासेना तालुका प्रमुख सुरज काळे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी नेते प्रसाद दादा कर्णावत, भाजप युवा नेते वैभव कार्ले, गणेश घायतडक, राजमुद्रा ग्रुप, मावळा ग्रुप खर्डा, हिरामोती उद्योग समूह, सचिन काका आजबे आणि सर्व नायगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.





