जामखेड न्युज——
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार – वैभव अब्दुले
विशाल (भाऊ) अब्दुले मित्र मंडळाच्या वतीने जामखेड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
जामखेड तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अब्दुले गुरूजी यांचे चिरंजीव वैभव अब्दुले यांच्या वाढदिवसानिमित्त भिमटोला यंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून विशाल (भाऊ) अब्दुले मित्र मंडळ जामखेड यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना परिपाठ घेण्यासाठी साऊंड सिस्टीम देण्यात आली त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयाच्या निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. तसेच जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्ये तरूण मित्र मंडळाच्या वतीने केक कापून वाढदिवस ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.
जामखेड नगरपरिषद याठिकाणी नगरपरिषदेतील साफसफाई काम करणाऱ्या सर्व महिलांना वैभव अब्दुले यांच्या वाढदिवसानिमित्त साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय साळवे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
अजय साळवे यांनी बोलताना सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवणे अत्यंत आवश्यक असून तेच कार्य अब्दुले कुटुंबाकडून होत असताना दिसून येत आहे. उपस्थित मान्यवरांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचारणात आणणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले व उपेक्षित, वंचित घटकातील गरजू लोकांना आपल्याला शक्य असेल ती मदत करण्याचे आवाहन केले. आणि वैभव अब्दुले यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. विकी घायतडक, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, पांडुरंग भोसले, राहुल उगले, संपत राळेभात, शिवाजी ससाणे, बापुसाहेब गायकवाड, प्रा. लक्ष्मण ढेपे यांनी मनोगते व्यक्त करून वैभव अब्दुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वैभव अब्दुले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या शुभेच्छा स्विकार करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आयुष्यभर करत राहणार असल्याचे सांगितले व सर्वांचे आभार मानले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, विशाल (भाऊ) अब्दुले, अनिल पवार, अनिल बाबर, जोगेंद्र थोरात, इरफान शेख, फिरोज पठाण, मुजफ्फर आतार, गणेश घायतडक, शुभम जाधव, दीपक सदाफुले, आतिश पारवे, बाबुभाई शेख, सुधीर अब्दुल्ले, आनंद गायकवाड, विक्रांत घायतडक, विक्रांत अब्दुले, गौरव सदाफुले, स्वप्निल खाडे, राणा सदाफुले, राहुल झेंडे, रोहित राजगुरू आदींसह जामखेड नगरपरिषदेतील कर्मचारी व अनेक युवा कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे विक्रांत अब्दुले यांनी आभार मानले.