राजश्री मोहन पवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम

0
149

जामखेड न्युज——

राजश्री मोहन पवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम

जामखेड नगरपरिषदेच्या माजी बांधकाम समिती सभापती राजश्री मोहन पवार व मोहन पवार यांच्यावतीने मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

जामखेड शहरातील तपनेश्वर रोडवरील हनुमान मंदीरात आयोजीत करण्यात आलेल्या हळदीकुंकू या कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक नऊ व तपनेश्वर भागातील महिला व तिळगुळ वाटप कार्यक्रमासाठी द्वारकाबाई शिंदे, शोभा जाधव, कविता समुद्र, राजश्री साळवे, कांताबाई गायकवाड, सुमनबाई समुद्र, रेशमा पवार, हिराबाई सोनवणे, दिपाली वनवे, सुरेखा चव्हाण अनिता विटकर यांचेसह महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जामखेड नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती राजश्री पवार व मोहन पवार हे प्रभागाच्या रस्ते, वीज, पाणी आदीच्यां विकास कामांबरोबरच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यबरोबरच आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजन करत असतात.

या बरोबरच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी व मान्यवरांचाही विविध कार्यक्रमांमधून सन्मान केला जातो.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मोहन पवार व उपस्थित भाविकांनी श्री हनुमानाचे भक्ती भावाने दर्शन घेतले.

आज घेतलेल्या मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमासाठी महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती. या उपस्थितीबद्दल राजश्री मोहन पवार व मोहन पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here