जामखेड न्युज——
बिभीषण धनवडे मित्रमंडळाच्या वतीने खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा न्यु होम मिनिस्टर कार्यक्रम
मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा न्यु होम मिनिस्टरचा भरगच्च कार्यक्रम होणार आहे यासाठी अभिनेता क्रांती ( नाना) मळेगांवकर गप्पा, गोष्टी, रंजक खेळासोबत गावरान काँमीडीचा तडका होणार आहे. तसेच बालगायीका टी. व्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी व माता भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन बिभीषण (मामा) धनवडे यांनी केले आहे.
वार शनिवार दि. २८ रोजी सायंकाळी पाच वाजता ल. ना. होशिंग विद्यालयाच्या भव्य मैदानावर न्यु होम मिनिस्टर चा खेळ रंगणार आहे. यात खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा कार्यक्रम असेल यासाठी खास उपस्थिती म्हणून खासदार डॉ सुजय विखे पाटील व सौ. धनश्रीताई सुजय विखे पाटील तसेच आमदार प्रा राम शिंदे व सौ. आशाताई राम शिंदे उपस्थित राहणार आहेत.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा न्यु होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी प्रथम बक्षिस १२५५१ रूपये किंमतीची पैठणी, द्वितीय बक्षीस ७००० रुपयांची पैठणी, तृतीय पाच हजार रुपयांची पैठणी, चतुर्थ २१०० रूपयांची पैठणी, पाचवे बक्षीस १५०० रूपयांची पैठणी असे भरगच्च बक्षिसे आहेत.
कार्यक्रमासाठी सर्व महिलांना मोफत प्रवेश असेल सहभागी महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी व माता भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन बिभीषण (मामा) धनवडे यांनी केले आहे.