जामखेड न्युज——
अत्याधुनिक दंतसेवेबरोबरच सामाजिक कार्यात आगळावेगळा ठसा उमटवणारे डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे
जामखेड मधील एकमेव ISO certified Dental clinic आहे.
जामखेड तालुक्यातील मागील दहा वर्षापासून हेल्थ दातांचा दवाखाना आणि सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉ.सागर कुंडलिक शिंदे MDS ( Gold medalist) आणि त्यांच्या पत्नी डॉ. मयुरी सागर शिंदे (BDS) दंतशल्य विशारद हे दातांच्या दवाखान्याच्या माध्यमातून गरजू पेशंटला सुविधा पुरवत आहेत. डॉ. शिंदे आणि मयुरी शिंदे हे दोघेही अत्यंत हुशार आणि अनुभवी डॉक्टर आहेत त्याचप्रमाणे जामखेड मध्ये होणाऱ्या सार्वजनिक आणि सामाजिक कामांमध्ये ते हिरारीने भाग घेतात. मोफत दंततपासणी शिबीर, तसेच शेकडो अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारून त्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत म्हटले जाते.
जामखेड न्यूजने अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर सागर शिंदे यांच्या बद्दल थोडे जाणून घेतले. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातून ग्रामीण भागातून घेऊन डॉक्टर सागर शिंदे यांनी कुठलाही क्लास न लावता फक्त कॉलेजला जाऊन आणि चिकाटीने अभ्यास करून व BDS ऍडमिशन पटकावले, Maharashtra University of Health sciences,Nashik. यामध्ये त्यांनी आपले BDS पूर्ण केले. त्यानंतर MDS एंट्रन्स exam चा अभ्यास करत असताना, परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी एक वर्ष दंत महाविद्यालयात tutor व नोकरी केली, दिवसा नोकरी करायची आणि रात्री MDS एंट्रन्स exam चा अभ्यास करायचा, हा ध्यास त्यांनी घेतला. PIMS या युनिव्हर्सिटी मध्ये periodontology and implantology या विषयात त्यांनी MDS चे शिक्षण घेतले, एवढेच नाही तर डॉक्टर सागर शिंदे हे MDS Gold medalist with distinction आहेत. त्यानंतर त्यांनी जामखेड येथे नवीन बस स्टँड समोर ,खाडे नगर येथे एका छोट्या दुकानांमध्ये आपला दवाखाना सुरू केला, यादरम्यान डॉक्टरांनी
fellowship in implantology (Nobal biocare implant system, Switzerland) पूर्ण केली.
आणि याचा फायदा जामखेड वासियांना झाला. संपूर्ण दात पडले तरी पण कोणत्याही वयात आपण पक्के दात बसू शकतो आणि ते यशस्वी होतात हे डॉक्टरांनी दाखवून दिले. अत्याधुनिक दंत उपचार पद्धती आणि उत्कृष्ट उपचार तेही माफक दरात यामुळे अगदी अल्पावधीतच डॉक्टरांनी सुप्रसिद्ध नावलौकिक मिळवला.
Orthodontics diploma course मार्फत डॉक्टरांनी आतापर्यंत 250 हून अधिक पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात यशस्वी झाले.
पूर्वी MDS डॉक्टर जामखेड मध्ये नसल्यामुळे पेशंटला नगरला किंवा बीड, पुण्याला जावे लागत असे. मात्र डॉक्टर सागर शिंदे यांच्या येण्यामुळे ही पोकळी भरून निघाली आणि हजारो पेशंटचा फायदा झाला. आज नवनवीन तरुणांना ज्यांचे दात वेडेवाकडे आहेत किंवा ज्यांना दातामुळे हसता येत नाही अशा अनेक लोकांना ऑर्थरोटिक ट्रीटमेंट म्हणजे दातांना तारा लावणे या मार्फत , त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात यशस्वी झाले आहेत.
डॉक्टर मयुरी शिंदे याही अतिशय हुशार डेंटिस्ट आहेत, महिलांमध्ये डॉक्टर मयुरी शिंदे यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या पद्धतीचे खूप कौतुक केले जाते, आज पैसे भेटतील ना भेटतील ,,परंतु पेशंटच्या दातांच्या वेदना बंद करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून त्या काम करत असतात. याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांची समाजसेवा
हेल्थ दातांचा दवाखाना सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉक्टर सागर शिंदे आणि मयुरी शिंदे यांनी अनेक फ्री डेंटल चेकअप घेतले आहेत. आज पर्यंत त्यांनी बारा फ्री डेंटल चेक अप कॅम्प आणि जामखेड मधील पाच शाळांना डेंटल कॅम्प आणि दवाखान्या मार्फत मार्गदर्शन आणि टूथपेस्ट आणि ब्रश दिलेली आहेत. लहान मुलांमध्ये दात स्वच्छ ठेवण्याची भावना रुजावी आणि त्यांना सवय लावावी यासाठी हे कॅम्प घेतले जातात.
एक सेवाभावी उपक्रम
मागील सहा वर्षापासून जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय येथील गरीब व अनाथ मुलांना त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांच्या शिक्षणाचा भार यांनी उचललेला आहे. आत्तापर्यंत 86 अनाथ मुलांना डॉक्टर शिंदे यांनी मदत केलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि आई-वडिलांनी दिलेल्या समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवत आहेत.
हेल्थ दातांचा दवाखाना येथे उपलब्ध सुविधा
डॉ. सागर कुंडलिक शिंदे हे गेली 10 वर्षे दाताच्या समस्यांसाठी सेवा देताना सुसज्ज हाॅस्पिटलच्या माध्यमातून अॅडव्हान्स रूट कॅनाल(RCT), आर्थोडोटीक ट्रिटमेंट व डेंटल इम्प्लान्ट , लहान मुलांच्या दातांचे रोड काम करणे, सेवेसाठी सतत प्रयत्नशील असतात.
पक्के कृत्रिम दंतरोपण
स्क्रूच्या साहाय्याने पक्के दात बसवणे (डेंटल इम्प्लांन्ट)
दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे
काॅस्मेटीक डेंटिस्ट्री , स्माईल डिझाईनिंग
ओपीजी एक्सरे: जामखेड मधील प्रथमच ओपीजी एक्सरे मशिन डॉक्टरांनी घेतली.
जबड्याचे फ्रॅक्चर काढणे, गाठी काढणे, कॅन्सर निदान दात स्वच्छ करणे, दंत व्यंगोपचार दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे.
चांगल्या दातांच्या आरोग्यासाठी डॉ. सागर शिंदे लोकांना आवाहन केले आहे की
1.व्यसनमुक्त राहणे – तंबाखू, सिगारेट, मावा यापासून दूर राहणे,
2.दाताची स्वच्छता – ब्रश, माउथ वाॅश, 3.डेंटल फ्लॉस नियमित वापरणे,
4.ब्रश तीन महिन्याला बदलणे
5.प्रत्येक जेवणानंतर चुळ भरणे
वेडेवाकडे दात सरळ करणे, यामुळे दात स्वच्छ करणे सोपे जाते
दात नसल्यास दात बसवून घेणे यामुळे बाकी दातांचे आरोग्य चांगले राहते
किडलेल्या दातावर त्वरीत उपचार करणे दुसरे दात किडत नाहित
नियमितपणे सहा महिन्यातून एकदा दाताच्या डॉक्टर कडून तपासणी करून घेणे
अशा प्रकारे काळजी घेतली तर आपल्या दातांचे सौंदर्य अधिक चांगले दिसते.
ठळक वैशिष्ट्ये
अत्यंत आधुनिक पद्धतीने दातांच्या इन्स्ट्रुमेंट चे व साधनांची निर्जंतुकीकरण केले जाते.
सर्व उपचार स्पेशल MDS डॉक्टर मार्फत केले जातात.
लेझर आणि कॉटर ट्रीटमेंटच्या सुविधा उपलब्ध.
अत्यंत उच्च प्रतीचा डेंटल असिस्टंट चा स्टाफ आहे त्यामुळे पेशंटला उपचारानंतरच्या सूचना आणि काळजी व्यवस्थित घेतली जाते.
डॉक्टर स्वतः एमडीएस असल्याने हिरड्यांचे ऑपरेशन करणे, तोंडात जबड्यावर आणि चेहऱ्यावर असलेल्या गाठी काढणे, अडकलेली जिभेची कातडी वरती उपचार करणे. इत्यादी उपचार केले जातात. डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दंतसेवेबरोबरच सामाजिक कार्यात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
[13/11, 5:05 pm] Dr Sagar Shinde Jkd: जामखेड मधील एकमेव ISO certified Dental clinic आहे.