जामखेड न्युज——
गायरान जमिनीवर वास्तव्यास राहणाऱ्या गरीब कुटुंबांना बेघर होऊ देणार नाही – सरपंच हनुमंत पाटील
तालुक्यातील गायरान जमीनीवर पिढ्यानपिढ्या अनेक गरीब कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबियांच्या बरोबर पुर्ण ताकदीने आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस उभे राहणार असून कोणालाही बेघर होऊ देणार नाहीत असे प्रतिपादन साकतचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हनुमंत पाटील यांनी केले.
सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित केल्यास बेघर होणाऱ्या दुर्बल घटकातील लोकांच्या बाजूने आमदार रोहित पवारही ठामपणे उभे आहेत. नुकतेच आमदार पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गोरगरीब जनतेचा सहानुभूती पुर्वक विचार करावा असे सांगितले होते यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
प्रशासन या गरीब जनतेला नोटीस देऊन जो मानसिक अर्थिक त्रास देतय तो त्रास थांबला पाहीजे, गायरान जमिनीवर वास्तव्यास नसण-याही काही लोकांना विनाकारण नोटीस दिल्या जातात तो त्रासही लवकरात लवकर थांबवुन सरकार आणि स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेने या कुटुंबियांना आधार देण्यासाठी योग्य ती पावले उचलावित
गायरान जमिनिविषयी कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणुन सरकारने कायदेशीर बाजु मांडायला हवी कष्टकरी गोरगरीब जनतेवर होणारा हा खुप मोठा अन्याय आहे गायरान जमिनीवर वास्तव्यास असणारे सर्व भुमिहीन,मोलमजुरी करून पोट भरणारे गरीबच आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्याविषयी संवेदना दाखवुन त्यांच्यावतीने कोर्टात आपली बाजु मांडावी व गायरान जमिनीवर वास्तव्यास असणा-या जनतेला आधार द्यावा त्यांचे घर असलेली जागा त्यांच्या मालकी हक्काची करून द्यावी.
शासकीय गायरान जमीन नाममात्र म्हणजेच फुकट कंपण्यांना भाडेतत्वार देऊन पैसे कमविण्यासाठी किंवा पैसे मिळण्यासाठी गायरान जमीनीवरील गोरगरीबांचे घर पाडुन संसार उध्दस्त करणे हा त्यांच्यावर केलेला खुप मोठा अन्याय, हा अन्याय सर्वसामान्य जनता कधीही सहन करणार नाही आम्ही जनतेसोबत राहुन कायदेशीर लढाई लढु असे सरपंच हनुमंत पाटील म्हणाले.
शहरात महत्वाच्या ठीकाणी असलेल्या शासकीय जागेवर सरकार श्रीमंत लोकांना जागा मोफत देऊन स्वस्तात घर बांधुन देत आणि ग्रामीण भागातील महत्व नसलेल्या गायरान जमीनीवर मोलमजुरी करून स्व:खर्चाने बांधलेली घर उध्वस्त करत हा सर्वसामान्य कष्टक-यांसोबत केलेला खुप मोठा भेदभाव आहे , हा भेदभाव थांबला पाहीजे गोरगरीब भुमिहीन जनतेला न्याय मिळाला पाहीजे ही जबाबदारी सरकारने घेऊन यावर योग्य तो मार्ग निघायला हवा
गायरान जमीनीवर वास्तव्यास असणा-या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरांच्या हक्काच्या जागा त्यांच्याचं नावावर करुन द्याव्यात ही सरकारकडे मागणी करणार असल्याचे सरपंच हनुमंत पाटील यांनी जामखेड न्यूजशी बोलताना सांगितले.
चौकट
हातावर पोट असलेल्या नागरिकांचा हा विषय असून जर हे लोक बेघर झाले तर त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी न्यायालयाच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्यासाठी त्यांना सामान्य लोकांची बाजू न्यायालयात मांडून या निर्णयाला स्थगिती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मुख्यमंत्री साहेबांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेत या प्रकरणात लक्ष घालून ताबडतोब योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देखिल दिले आहेत.
-आमदार रोहित पवार