जामखेड न्युज——
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा,करिअर मार्गदर्शन
ल.ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न इयत्ता अकरावी व बारावीच्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल.देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेतून करियरच्या असणाऱ्या संधी या संदर्भात सांगतांना केवळ बुध्दिमत्ता महत्वाची नसून इच्छित ध्येयासाठी प्रचंड कष्ट, मेहनत, सराव आणि आवड महत्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळेल हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
या वेळी त्यांचे समवेत एम पी एस सी परीक्षा उत्तम गुण प्राप्त इंजिनिअर श्री अश्विन पारधी यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगून विविध क्षेत्रातल्या संधी काय आहेत हे सांगून त्यासाठी अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
बारावी परीक्षेनंतर तलाठी, पोलिस, ग्रामसेवक या परीक्षांना सामोरे जाताना कसा अभ्यास करावा या बाबत माहिती दिली.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरुण शेठ चिंतामणी, निवृत्त शिक्षक श्री हेमंत देशमुख गुरुजी तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर, उपप्राचार्य पोपटराव जरे सर, स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा.आघावसर,व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा श्री नवनाथ ढेरे,प्रा श्री विनोद धुमाळ,श्री संजय समुद्र,प्रा श्री संभाजी शेटे,श्री विजय साळुंखे, प्रा श्री भाऊसाहेब भोगील या सर्वांनी प्रयत्न केले.
प्रास्ताविक प्रा श्री आघाव सर यांनी केले तर आभार प्रा श्री सिध्देश्वर पवार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा सौ प्रमिला पोकळे व प्रा सौ वंदना डुचे यांनी केले.