जामखेड न्युज——
लोकनेत्याच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती!!!
महाराष्ट्रात लोकनेत्याच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती झाली बीड जिल्ह्यात रेल्वे सुरु झाली या आनंदाच्या क्षणी ही मन गहिवरून आलं ज्या लोकनेत्यानं चाळीस वर्षे सर्वसामान्यांच्या हितासाठी संघर्ष केला तो लोकनेता आज या आनंदाच्या क्षणी आपल्यात नाही हे दु:ख जमलेला प्रत्येक चेह-यावर स्पष्टपणे जाणवत होतं,एका राजकारण्याने त्याच्या आयुष्यात ख-या अर्थाने काय कमवायला हव याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्व, गोपीनाथरावजी मुंडेसाहेब, आजही त्यांच्या आठवणीत सर्वसामान्यांच्या डोळ्यात येणारे अश्रु साक्ष देतात महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी जगलेला नेता म्हणजे हाच तो महाराष्ट्राचा लोकनेता.
संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवलं पण कधी सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही.
सध्याच्या काळात नेते कितीही असतील पण लोकनेता होण सोप नाही सोन्याचा चमचा तोंडात घेउन काल परवा राजकारणात आलेल्यांनाही वाटत आपण लोकनेता आहोत.
त्यासाठी वंचितांच्या, पिडितांच्या , शोषितांच्या, दिनदुबळ्यांच्या, तळागाळातल्या, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी निःस्वार्थ आयुष्य खर्च कराव लागतं तेंव्हा कुठ लोकांच्या तोंडुन लोकनेता शब्द बाहेर पडतात.
एकदा सदस्य म्हणुन विधानसभेत गेलं की लोकनेता होणं हा विचार करणं सुध्दा लोकनेता या शब्दाचा अपमान वाटायला लागतो अलीकडच्या काळातल्या राजकारण्यांना एकदा आमदार झालं तरी वाटतं आपण लोकनेता झालोत.
स्व,गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांच गोरगरीब , कष्टकरी, शेतकरी सर्वसामान्य जनतेसाठीचं योगदान महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता कधी विसरु शकणार नाही. नेते येतील जातीलं पण लोकनेता म्हणुन मुंडेसाहेब कायम सर्वसामान्यांचा आठवणीत राहतीलं
आपल्या नेत्यावर असलेला विश्वास आणि भरभरुन मिळणारं प्रेम हे खुप कमी लोकांच्या नशिबात असतं म्हणून काल रेल्वे उद्घाटन सोहळ्यात गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन लोक रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभे होते.