तर आमदार खासदाराच्या दारात आंदोलन -अॅड अरूण जाधव

0
219
जामखेड न्युज——
                      
         2017 साली खर्डा गावच्या मदारी समाजास मंजूर झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे बांधकाम अजूनही सुरू होऊ शकले नाही, यामुळे वंचित बहुजन आघाडीने 31/ 8 /22 रोजी भटके विमुक्त दिनानिमित्त खर्डा चौक जामखेड येथे मदारी समाजासह अर्ध नग्न आंदोलन केले व आज 1/9/22 रोजी जामखेड पंचायत समितीच्या आवारात  वंचित बहुजन आघाडीने बेमुदत आंदोलन चालू केले होते. मोठ्या संख्येने मदारी बांधव ,वंचित तसेच लोक अधिकार आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अॅड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर हे आंदोलन चालू राहिले. सायंकाळी सहा वाजता गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आंदोलनकर्त्यांशी समक्ष येऊन संवाद साधला व आंदोलन थांबवण्याबाबत विंनती केली. 
त्यांनी आतापर्यंत वसाहती साठी केलेले काम याबाबतची मांडणी केली. आणि मदारी वसाहतीच्या बांधकामाला सुरवात करण्यासाठी  15 दिवसाचा अवधी  मागितला. त्यावर अरुण जाधव म्हणाले दोन वेळा आपण आश्वासने दिली आम्ही तुमचं ऐकलं आणि आम्ही थांबलो,कारण याआधी पाच वेळा या वसाहतीसाठी आंदोलने केली आहेत पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. सर्व अधिकारी, खर्डा गावचे नागरिक, मदारी समाजाच्या बाजूने आहेत तरीही हा प्रश्न का सुटत नाही, यामध्ये राजकारण आहे काय.कारण मागच्या सात वर्षापासून हा लढा चालू आहे अनेक विकास कामे सुरू झाली आणि मार्गीही लागली परंतु वसाहतीचे बांधकाम मात्र सुरू होऊ शकले नाही. लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडण्यास अनुकूल नाहीत असा आरोप जाधव यांनी केला.
 लोक अधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या पंधरा दिवसा ऐवजी एक महिना घ्या पण कामाला सुरुवात करा,असे सांगितले कारण मागच्या वेळेस देखील असेच दहा दिवसाचे आश्वासन दिले होते ते पूर्ण होऊ शकेल नाही परत पुन्हा चुकीचे आश्वासन देऊ नका एक महिन्याचा वेळ घ्या परंतु काम पूर्ण करा त्यावर गटविकास अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी एक महिन्याचा अवधी घेऊन दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त मदारी वसाहतीच्या कामाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्याचे नक्की केले. 
आणि तसे लेखी पत्र त्यांनी दिले यावेळी लोक अधिकार आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, सलीम मदारी, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आजिनाथ शिंदे,सचिन भिंगारदिवे, संविधान प्रचारक तुकाराम पवार, संतोष चव्हाण यांनी मनोगते मांडली. शाहीर बाबासाहेब राजगुरू यांनी चळवळीची गाणी गायली. या गाण्यामुळे आंदोलन कर्त्यांमध्ये उत्साह कायम राहिला. दिवसभर झालेले या धरणे आंदोलनास प्रदीप टापरे मनसे, सनी सदाफुले मनसे तसेच पोपट फुले लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष यांनी पाठिंबा दिला.
             वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी व्हर्च्युअल शुभेच्छा देऊन पाठिंबा दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, लोकाधिकार आंदोलन संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष द्वारका पवार, संविधान प्रचारक गणपत कराळे, सामाजिक कार्यकर्ते अरुण डोळस, वैजिनाथ केसकर, भीमराव सुरवसे ,लाला वाळके, राजू शिंदे, अतुल ढोणे, सागर ससाने, फकीर मदारी, हुसेन मदारी, अरविंद जाधव ,संतोष पवार व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या वेळेला या आंदोलनात सहभागी झाले होते.आभार गणपत कराळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here