आठ दिवसांत लेंडी नाल्यावरील अतिक्रमण हटवणार: खासदार डॉ. विखे पाटील

0
240
जामखेड न्युज——
कोणाचाही विचार न करता शिर्डी शहरातील लेंडी नाल्यावरील हॉटेल बांधकाम तसेच वॉल कंपाऊंडचे अतिक्रमणं येत्या आठ दिवसात तोडणार असून यासाठी आम्ही मोठी मोहीम हाती घेतली असल्याची प्रतिक्रिया नगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी बोलतांना दिली.
दरम्यान दि.३१ ऑगस्ट रोजी गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शिर्डी शहरात पावसाच्या पाण्याने दाणादाण करुन टाकली होती. तर अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डी शहरात पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या ठिकाणी पहाणी दौरा केला.
यावेळी कनकुरी रोडलगत असलेल्या लेंडी नाल्याची तसेच नांदुर्खी पाटातून येणाऱ्या पाण्याची पहाणी केली आहे. तर लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे लक्ष्मीनगर येथील नागरीकांच्या घरामध्ये पहाणी करून येथील सर्व नागरीकांना एकसमान मदत देण्यात येईल तसेच यामध्ये धान्य, पिण्याचे पाणी तसेच नुकसान झालेल्या नागरीकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेच्या माध्यमातून शासन नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येईल असे आश्वासन खा विखे यांनी दिले.
त्याचबरोबर नगरपरिषद प्रशासनाला तातडीने लक्ष्मीनगरमधील साचलेले पाणी आणी गाळ स्वच्छ करण्यासाठी सुचनाही केल्या आहेत. अतिक्रमण करू नका असे आम्ही वारंवार सांगत आलो आहे. आता यापुढे कोणाचाही विचार न करता या सगळ्या ठिकाणी हाॅटेल अतिक्रमणे असेल किंवा भिंत असेल याचा विचार न करता येत्या आठवडाभरात तुटलेलं दिसेल. यासाठी आम्ही मोठी मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेच्या अंतर्गत ओढ्या नाल्यावरील सगळे अनधिकृत बांधकामे तोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here