जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शिऊर चे सुपुत्र सुजल तनपुरे यांने कुस्तीमध्ये नॅशनल लेव्हलवर सुवर्णपदक मिळवल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख पांडुरंग भोसले, शिवाजी नाना खंडागळे अतुल पवार भाउ पोटफोडे पत्रकार ओंकार दळवी चेतन राळेभात , मयूर भोसले, बंटी पाटील, गणेश जोशी, मल्लखांब विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुजल ने हरियाणा (रोहतक) या ठिकाणी झालेल्या U15 नॅशनल कुस्ती स्पर्धेत 68 किलो वजन गटात पहिल्या कुस्तीमध्ये पंजाबच्या दिपक सिंग या मल्ला वरती 10-0 असा विजय मिळवला. नंतर कॉटर फायनल च्या कुस्तीमध्ये उत्तर प्रदेशच्या विकेश यादव यावरती 9-2 असा विजय मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, सेमी फायनल मध्ये दिल्लीच्या निशांत रोहील वरती 3-1 असा विजय मिळवला व फायनल मध्ये प्रवेश केला, फायनल कुस्ती मध्ये हरियाणाच्या यश सोबत चिटपटीने विजय मिळवत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले.

तो मामासाहेब मोहोळ तालमीत सराव करत आहे तर वस्ताद- पंकज दादा हरपुडे व महेश मोहोळ, अमित जाधव यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
जामखेड तालुक्याच्या वैभवात सुजलच्या कुस्तीमधील सुवर्णपदका मूळे भर पडली आहे . जमखेडचे नावदेशपातळीवर चमकले आहे.





