जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या जादूच्या कांडीने आमदार रोहित पवारांना धक्का

0
297

जामखेड न्युज——

 

तालुक्यातील आरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असुन दोन सदस्य भाजप मध्ये दाखल आहेत.आता भारतीय जनता पक्षाची ग्रामपंचायत सदस्य संख्या ७ झाली आहे.

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची आलेल्या आरणगाव ग्रामपंचायत आमदार प्रा राम शिंदे गटाची सरशी झाली आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक उद्योगपती अमोल शिंदे माजी सरपंच आजीनाथ नन्नवरे, अंबादास राऊत , जामखेड तालुका भाजपचे सरचिटणीस लहुजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या अंकुश शिंदे यांची सरपंच पदी व उपसरपंच पदी सविता आपासाहेब राऊत यांची निवड झाली होती.

यावेळी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी विध्यमान आमदार यांनी अधिकारी वर्गावर दबाव टाकून जिल्हाधिकारी व आयुक्त नाशिक यांचा निकाल विरोधात दिला परंतु सरपंच अंकुश शिंदे यांनी हायकोर्टात दाद मागितली हायकोर्टाने दिलासा दिला व सरपंच उपसरपंच यांची निवड कायम ठेवली आहे.

आज कापरेवाडी ता कर्जत येथे पारेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अॅड संजय बाबुराव पारे, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ डमाळे, लिंबू व्यापारी गोवर्धन राऊत, राजेंद्र निगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, पिंपरखेडचे हट्रिक सरपंच बापूराव ढवळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, पाटोदा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, पांडुरंग उबाळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोठरे, गणेश क्षिरसागर, तात्या माने, उदयोगपती अमोलशेठ शिंदे, भाजपा सरचिटणीस लहुजी शिंदे, गोवर्धन राऊत,अतुल पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष नन्नवरे, सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच आप्पासाहेब राऊत, सदस्य डॉ सिताराम ससाणे, रमजान शेख, राजेंद्र निगुडे, सचिन राऊत, निखिल पंडित, प्रवीण नन्नवरे, रामा शिंदे, जालिंदर पारे, रावसाहेब पारे, कालिदास पारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here