जामखेड न्युज——
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त खेमानंद इंग्लिश स्कूलमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण करण्यात आले आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी हेमंत इंग्लिश स्कूल जामखेड येथे अमृत महोत्सवी ध्वजारोहण समारंभ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला याप्रसंगी जामखेड तालुक्याचे सुपुत्र व माजी सैनिक श्री मधुकरराव काशीद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

या कार्यक्रमासाठी माजी सैनिक श्री तानाजी गर्जे व श्री जलाल शेख हेही उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार श्री सदाशिवराव लोखंडे साहेब यांचीही मार्गदर्शन लाभले .याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजय पवार सचिव श्री सतीश शिंदे प्राचार्य श्री शिवानंद हलकुडे व सर्व स्टाफ उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो वैशाली पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या मुलींनी केले व आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्री अमोल ढाळे सर यांनी केले .





