जामखेड न्युज——
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे कुसडगाव येथील श्री काळोबा ग्रामविकास प्रतिष्ठानने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांनी संपुर्ण जवळा गटात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आहेत यामुळे गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. वह्या वाटपामुळे शरद कार्ले यांचे कौतुक होत आहे.

गोरगरिबांच्या शिदोरीत नेहमीच मदतीचा व माणुसकीचा वसा जपणारे गोरगरिबांच्या उघड्या बोडके अंगावर मायचे छत्र पाघरणारे नेहमीच गोरगरिबांच्या हाकेला धावून येणारे पैलवान शरद दादा कार्ले यांनी आज जिल्हा परिषद गट जवळा या गटामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

श्री काळोबा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष- शरद दादा कार्ले तर्फे यांच्याकडून शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटूंबातील मुलांचे शिक्षण अवघड झाले आहे. ही गरज लक्षात घेऊन त्यांना ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे भा ज पा युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष शरद दादा कार्ले यांनी जामखेड न्युजशी सांगितले.

जि प जवळा गटातुन पालक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच इथून पुढच्या काळात गोरगरीब जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी नेहमीच मदत करण्याचे आश्वासन शरद दादा कार्ले यांनी दिले.