जामखेड परिसरातील निसरडा रस्ता बनला मृत्यूचा सापळा समीर पठाण गंभीर जखमी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी धावले मदतीला

0
372
जामखेड प्रतिनिधी
           जामखेड न्युज——
 जामखेड शहरातील विंचरणा नदी जवळ विश्रामगृहासमो रस्त्यावर चिकन माती पडल्यामुळे रात्री 9:45 वाजता रोडवर मोठमोठे खड्डे झाल्याने मोटरसायकल क्रमांक MH 23 AE 8379 आणि चार चाकी MH 40 BE 9888 या वाहनाचा जोरात धडक होऊन अपघात झाल्याने समीर ताहेर पठाण वय 30 मुक्काम पोस्ट पाटोदागरडाचे तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या  थारोळ्यात पडले होते. 
घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे काही क्षणातच आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले यांनी या जखमीस ताबडतोब आणून खाजगी रुग्णालयात दाखल केले डॉक्टर भरत दारकुंडे यांनी त्याच्यावर उपचार करून गाला जवळ मोठी जखम झाली होती त्या जखमेस टाके घेऊन रक्तस्त्राव बंद करून त्यास ताबडतोब अहमदनगर येथे हलवण्यात आलेले आहे त्याच्या जबड्याला जबर मार लागलेला आहे तब्येत बरी आहे. यावेळी प्रमोद पोकळे, महेंद्र शिरसागर यांनी मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here