निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पुर्ण केली -नगरसेवक मोहन पवार मिडिया क्लबच्या पदाधिकार्यांचा सत्कार संपन्न

0
203
जामखेड न्युज——
  मागील पाच वर्षांपूर्वी नगरपरिषद निवडणुकीत प्रभागातील नागरिकांना जी आश्वासने दिली होती ती पुर्ण केली आहेत. तसेच पुढे संधी मिळाल्यावर प्रभागातील राहिलेली कामेही मार्गी लावली जातील असे नगरसेवक मोहन पवार यांनी सांगितले. 
जामखेड मिडिया क्लबच्या नुतन पदाधिकार्यांचा नगरसेवक मोहन पवार मित्रमंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी नगरसेवक मोहन पवार, लहू पवार, अर्थराज गायकवाड ,आलताप शेख,  अनिकेत जाधव, शारीक सय्यद ,रोहित अवचरे ,साहिल सय्यद, राम शेळके, विजय जाधव, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, सहसचिव पप्पूभाई सय्यद, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले, किरण रेडे, अजय अवसरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
   यावेळी बोलताना मोहन पवार म्हणाले की, मागील निवडणुकी आगोदर जो जाहिरनामा प्रसिद्ध केला होता. त्या आश्वासनांची पुर्तता केली आहेत. हि कामे करतना पत्रकार मंडळीचे नेहमीच सहकार्य लाभले. जामखेड मिडिया क्लब अनेक समाजोपयोगी कामे करत आहे याबद्दल मिडिया क्लबच्या सर्व सदस्यांचे त्यांनी कौतुक केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here