जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात नुकतीच मिडिया क्लबची स्थापना झाली याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मुस्लिम समुदाय तसेच आमदार रोहित ( दादा) पवार मित्रमंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी सर्वानीच मिडिया क्लबला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, काँग्रेसचे जमीरभाई सय्यद, फुट वेअर संघटनेचे इस्माईल सय्यद, प्रा. जाकीर सर, जुबेर भाई शेख, हारून भाई शेख (नान्नज) लहू पवार यांच्या सह जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, सहसचिव पप्पूभाई सय्यद, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले, किरण रेडे, अजय अवसरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमरभाई कुरेशी म्हणाले की, जामखेड मिडिया क्लबचे सर्व सदस्य हे तळागाळात जाऊन काम करणारे आहेत मिडिया क्लबमुळे वंचित व गरीब लोकांना न्याय मिळतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. यामुळेच आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आमदार रोहित दादा मित्रमंडळाच्या वतीने मिडिया क्लबच्या सदस्यांचा सत्कार केला आहे.
यावेळी बोलताना जमीरभाई सय्यद म्हणाले की, मिडीया क्लबचे सर्व सदस्य हे खरे कलमचे बादशहा आहेत. समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात नेहमीच आवाज उठवणारे हे सर्व पत्रकार आहेत.
यावेळी इस्माईल सय्यद, जाकीर शेख यांनीही आपली मनोगते व्यक्त करत मिडिया क्लबला शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांनी सांगितले की, मिडिया क्लबचे सर्वच सदस्य समाजहिताच्या बातम्यांना नेहमीच न्याय देतात. सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.