जामखेड न्युज – – –
सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात व कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोलजी राळेभात साहेब व जामखेड मार्केट कमिटीचे माजी सभापती तथा संचालक सुधीर दादा राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड व कोल्हेवाडी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व १३ उमेदवाराचा विजय झालेला आहे.
साधारणपणे मागील सलग २५ वर्षापासून जामखेड सोसायटीमध्ये तात्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे आणि त्या कामाची पोहोच पावती म्हणून सभासदांनी मतदानातून जो काही विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाच्या वतीने माजी सभापती सुधीर दादा राळेभात यांनी दिली.
जामखेड सोसायटीचे ९५२ मतदार असून त्यापैकी तब्बल ८४९ मतदारांनी मतदान करून अंकुश रंगनाथ कोल्हे, अण्णा श्रीपती आजबे, बाबासाहेब नानासाहेब शेळके, हर्षल हेमंत देशमुख, लक्ष्मण मल्हारी डोके, तुकाराम ज्ञानोबा नेटके, अनिल दिगांबर राळेभात, रवींद्र वसंतराव राळेभात, पद्मिन दिनकर अडाले, शोभा नारायण कोल्हे, कुंडलिक नारायण औचरे, अप्पा हरिभाऊ कोळेकर, वसंत दगडू सदाफुले यांना ४०० पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून दिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये माजी प्रथम नगराध्यक्ष सौ.प्रीती विकास राळेभात यांना मोठ्या दारूण पराभवाला सामोरे जावे लागले..
एकाच दिवशी जामखेड व कोल्हेवाडी या दोन सोसायटयामध्ये मतदान होवून दोन्ही ठिकाणी १३-० ने विजय मिळालेला आहे. विशेष म्हणजे जामखेड शहरातील नेतृत्व करणारे सर्व पुढारी विरोधात जावूनही जनतेचा जनाधार हा कायम सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांच्या सोबत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.