जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
येथील जामखेड महोत्सव सांस्कृतिक समितीच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार ओंकार दळवी सचिवपदी श्रीधर सिद्धेश्वर,कार्याध्याक्षपदी अविनाश बोधले,खजिनदारपदी समीर शेख आदींसह इतर निवडी करण्यात आल्या यावेळी दि २८,२९ ,मार्च रोजी जामखेड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
जामखेड महोत्सव सांस्कृतिक समिती व कै महादेव आप्पा राळेभात स्मृती करंडक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे गेल्या १२ वर्षपासून आयोजन करून राज्यासह प्रामुख्याने ग्रामीण भागातील नवोदीत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपब्धद करून देण्यात येते तसेच जामखेड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम या समितीमार्फत राबविले जातात,जेष्ठ नेते मधुकर राळेभात,युवा नेते प्रा सचिन गायवळ,नगरसेवक पवन राळेभात,गुलाब जांभळे,संतोष पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते अध्यक्ष श्रीधर सिद्धेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे आयोजित केलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.यावेळी उपाध्यक्षपदी रजनीकांत साखरे,खजिनदारपदी समीर शेख,सहखजिनदारपदी दीपक तुपरे,सहसचिवपदी जितेंद्र आढाव आदींच्या निवडी करण्यात आल्या यावेळी कार्यकारणी सदस्यपदी सागर पवार,शरद डुचे. आनंद गाडेकर,मोरेश्वर राजगुरु,चिन्मय राजगुरू,स्वप्नील बरबडे,प्रलेश बोरा,अमित पिपाडा,सागर चौरे,धनराज पवार,युवराज खेत्रे,संजय फुटाणे,अर्जुन राजगुरू,दीपक उबाळे उपस्थित होते,यावेळी जामखेड महोत्सव सांस्कृतिक समिती व कै महादेव आप्पा राळेभात स्मृती करंडक राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात असून लाखो रुपयांची बक्षिसे ठेण्यात आली आहे.