पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर ला ट्रकची धडक; ५ भाविक ठार, ३० जखमी

0
254
जामखेड न्युज – – – 
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी जवळ पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेत २० ते २५ भाविक गंभीर जखमी झाले असून चार ते पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या अपघातातील मृतांची आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जखमीतील काही लोक तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील भाविक असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाची माहिती मिळताच सोलापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे.
   या अपघाविषयी बोलताना वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे म्हणाले की, या अपघातास जबाबदार असणाऱ्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत ताबडतोब मिळावी अशी मागणी जामखेड न्युजशी बोलताना इंगळे महाराज यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here