जामखेड न्युज – – –
पाच राज्याचे लक्ष लागून असलेल्या निवडणुकांचे निकाल लागले असून पाच पैकी चार ठिकाणी भाजपा तर पंजाब मध्ये आपची जादू चालली आहे.
सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कोण स्थापण करणार याचा फैसला काही तासात होणार आहे. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
दरम्यान, सध्या तरी भाजपने या निवडणुकीत मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कारण, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील.
उत्तरप्रदेश भाजपा 279
सपा 113
बसपा व काॅग्रेस 4
गोवा
भाजपा 17
काॅग्रेस 12
आप 2
उत्तराखंड
भाजपा 44
काॅग्रेस 22
पंजाब
आप 88
काॅग्रेस 16
मणिपूर
भाजपा 25
काॅग्रेस 11
अशा पद्धतीने सध्या निवडणूकीचे कल आहेत