जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कोणत्याही शाखेला कमी समजू नका ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करा. मन मेंदू व मनगट याच्या बळावर आपण जीवनात हवे ते साध्य करू शकतो. याचा खरा विकास शाळेतच होऊ शकतो. कष्टाचे संस्कार शाळेतच शिक्षक देतात त्यामुळे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार शिक्षकच आहेत असे मत माजी प्राचार्य श्रीराम मुरुमकर यांनी व्यक्त केले
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथिल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ज्ञानदेव मुरुमकर, पोलीस पाटील महादेव वराट, बाळासाहेब वराट, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीराम मुरुमकर म्हणाले की, विध्यार्थी दशेतच ज्यांचा स्वत:च्या ध्येयावर दृढ विश्वास असतो. तिच माणसं जीवनात यशस्वी होतात. मन, मनगट आणि मेंदू यांच्या सामर्थ्यातून तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता असे मत श्रीराम मुरुमकर यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, ज्ञानदेव मुरुमकर, बाळासाहेब वराट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर
श्रेया वराट, वर्षा कडभने, ऋतुजा मुरुमकर, अदित्य वराट या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुदाम वराट यांनी केले तर आभार महादेव मत्रे यांनी मानले.