जामखेड न्युज – – – –
8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिन ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सकाळच्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सौ. जयश्रीताई उद्धवराव देशमुख माजी पंचायत समिती सदस्या व प्रमुख उपस्थिती माननीय श्रीमती ज्योतीताई राजेंद्र बेल्हेकर बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक श्रीमती स्वाती सरडे मॅडम यांनी केले.सर्व जगभरामध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम युनोमुळे उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो.महिला सक्षमीकरण सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला या प्रत्येक महिलेचे योगदान अतिशय श्रेष्ठ आहे.अतिशय निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या महिला यांच्यामुळेच प्रत्येक घराची, गावाची,देशाची प्रगती होते.या त्यांच्या निस्वार्थी काम करण्याच्या वृत्तीमुळे अनेक क्षेत्रामध्ये अनेक उंचीवर अनेक महिलांनी आपली प्रगती सिद्ध केली आहे.आपल्या प्रास्ताविका च्यामनोगतामध्ये श्रीमती सरडे मॅडम यांनी सांगितले.
आज कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती श्रीमती ज्योतीताई राजेंद्र बेलेकर महिला बालकल्याण अधिकारी यांनी आपल्या मनोगतात सुरुवातीला सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी यांना शुभेच्छा दिल्या.अमेरिकेतील संघर्ष करणाऱ्या महिला यांच्यामुळे सुरुवात होऊन अमेरिकेत युनोने जाहीर केल्यानंतर 8मार्च महिला दिन सर्व जगभरामध्ये उत्साहात साजरा केला जातो.प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी एक दिवस असला पाहिजे.आणि तो एकच दिवस न ठेवता प्रत्येक दिवशीच प्रत्येक महिलांचा सन्मान झाला पाहिजे. प्रत्येक स्त्री सतत प्रामाणिकपणे काम करत असते.पूर्वी महिलांना चूल आणि मूल हेच काम करावे लागत असे, तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच प्रत्येक स्त्रीला शिक्षण घेता आले.अनेक क्षेत्रामध्ये अनेक उत्तम काम करणाऱ्या महिला आहेत.त्यामध्ये रिक्षाचालका पासून विमान चालवणे पर्यंत सर्व प्रकारची कामे महिला अतिशय उत्तम प्रकारे करतात.
मुलींना एकच संदेश देते तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करा, स्वतःच्या पायावर उभे राहा,घरी सांगा मला शिकायचं आहे. यशस्वी जीवनाची त्रिसूत्री प्रत्येकाच्या जीवनामध्ये या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जिद्द,चिकाटी,कष्ट या तीन गोष्टी महत्त्वाच्याआहेत. कष्टातून मिळालेलं श्रेष्ठत्व कायमस्वरूपी टिकून राहते.ध्येय आपण निश्चित केले पाहिजे.यश मिळवण्यासाठी त्यासाठी आपण खडतर कष्ट घेतले पाहिजे.कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नये.लवकर झोपले पाहिजे आणि पहाटे लवकर ऊठून अभ्यासाची सवय लावा.जीवनामध्ये नियोजन महत्वाचा भाग आहे.योग्य नियोजन व वेळेची बचत करून आपण आपले काम केले पाहिजे. आई-वडील,गुरुजन यांची काळजी घ्या नेहमी सन्मान करा व मोबाईलचा योग्य वापर करा शेवटी एवढच सांगेल माणूस म्हणून जगा परत एकदा महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा .
श्रीमती जयश्रीताई देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतातील प्रत्येक महिला योगदान श्रेष्ठ आहे. घरातील काम करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील तारेवरची कसरत करून कुटुंबासाठी अपार कष्ट घेतात.सर्व विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी झाले पाहिजे.सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सूत्रसंचालन श्रीमती सुप्रिया घायतडक मॅडम,श्रीमती स्वाती बांगर मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती वंदना अल्हाट यांनी केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे,उपप्राचार्य पोपट जरे,पर्यवेक्षक रमेश आडसुळ,शिक्षक प्रतिनिधी राघवेंद्र धनलगडे,समारंभ प्रमुख संजय कदम,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्रीमती सरडे स्वाती,श्रीमती डुचे वंदना,श्रीमती साबळे स्वाती, श्रीमती होमकर सुरेखा,श्रीमती पोकळे प्रमिला, श्रीमती भोसले योगिता,श्रीमती पवार ऐश्वर्या,श्रीमती संगीता दराडे,श्रीमती अल्हाट वंदना,श्रीमती घायतडक सुप्रिया,श्रीमती भालेराव पूजा,श्रीमती बांगर स्वाती सर्व महिला शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते





