ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साहेबराव थोरवे यांचे १२० व्या वर्षी निधन

0
178

जामखेड न्युज – –

साहेबरावजी पंढरीनाथ थोरवे दादा यांची आज रात्री 2वाजता प्राणज्योत मालवली. ते 120 वयाचे होते. गेल्या काही दिवसापासून दादा आजारी होत.त्याचा अंत्यविधी सकाळी ११ वाजता सोलापूर वाडी येथे होईल._
_राजकीय सामाजिक,क्षेत्रात व स्वातंत्र्य लढात भरीव योगदान असलेले, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,लोकमान्य शिक्षण संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी, आष्टी तालुक्याचे भीष्माचार्य म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, सलग 15 वर्ष आष्टी पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांनी पद् भूषवले, कडा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा मुक्तिसंग्राम मध्ये जीवाची बाजी लावून मोघली सत्तेच्या विरोधात मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकामध्ये यांचे नाव अग्रस्थानी राहिले असे माननीय साहेबरावजी पंढरीनाथ थोरवे दादा यांची आज वयाच्या 120 वा वर्षी प्राणज्योत मालवली.गेल्या काही दिवसापासून दादा आजारी होते.आज रात्री 2.वा ईश्वर इच्छेनुसार त्यांनी देह लोकीची यात्रा संपून आपल्यातून निघून गेले.आयुष्यभर धार्मिक, राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये वाहून घेतलेले धुरंधर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेल . ॲड. हनुमंतराव साहेबराव थोरवे. यांचे वडील तर धैर्यशील हनुमंतराव थोरवे. आजोबा होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here