जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी – चार वर्षांपासून फरार असलेले खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

0
404
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – –
 जामखेड तालुक्यातील जवळा  या गावात खोटे सोने खरे आहे असे भासवुन नेवलिया पो.पुर्व विष्णुपुरा ता.चारधाव जि.नदीया राज्य पच्छिम बंगाल हल्ली रा.भंडारवाडी ता.जि.उस्मानाबाद येथील मनोरंजन जोगेश हालदार व त्याचा भाऊ श्रीकृष्ण हालदार यांना जवळा गावात बोलावुन आरोपी नामे 1)केळ्या टका-या काळे, 2)संगिता केळ्या काळे , 3)महावीर केळ्या काळे सर्व रा.जवळा ता.जामखेड यांनी त्यांच्याकडील खोटे सोने दाखवुन फिर्यादीकडुन 3 लाख रूपये घेवुन फसवणुक केली होती पंरतु सदरचे सोने हे खोटे असल्याचे  फिर्यादीच्या लक्षात आल्याने फिर्यादी व त्याचा भाऊ यांनी त्यांचे पैसे आरोपीतकडुन परत हिसकावुन घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व फिर्यादीचा भाऊ श्रीकृष्ण हालदार यांचेत झटापट झाली त्यात आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्याने मारहान करून फिर्यादीचा भाऊ श्रीकृष्ण हालदार याचेवर चाकुने वार करून गंभीर जखमी करून आरोपी पळुन गेले होते.उपचारा दरम्यान फिर्यादीचा भाऊ श्रीकृष्ण हालदार हा मयत झाल्याने फिर्यादी नामे मनोरंजन जोगेश हालदार रा.नेवलिया पो.पुर्व विष्णुपुरा ता.चारधाव जि.नदीया राज्य पच्छिम बंगाल हल्ली रा.भंडारवाडी ता.जि.उस्मानाबाद यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.52/2018 भादवि कलम 302,394 ,397,420 प्रमाणे 1)केळ्या टका-या काळे ,2)संगिता केळ्या काळे ,3)महावीर केळ्या काळे सर्व रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर यांचेवर गुन्हा दाखल केलेला होता.त्यानंतर 4 वर्षापासुन फरार असलेले आरोपी 1)केळ्या टका-या काळे ,2)संगिता केळ्या काळे ,3)महावीर केळ्या काळे हे सापडत नव्हते.
                  दिनांक 28/3/2022 रोजी मा.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त्‍ बातमीद्वारा बातमी मिळाली की 1)केळ्या टका-या काळे ,2)संगिता केळ्या काळे हे दोन्ही आरोपी वेळापुर ता.माळशिरस जि.सोलापुर येथे आपले अस्तित्व लपवुन ऊस तोडीचे काम करून राहत आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने जामखेड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोसई राजु थोरात व त्यांचे स्टाफला माहिती देवुन सदर आरोपीस पकडण्याच्या सुचना देवुन गुन्हे शोध पथक वेळापुर ता.माळशिरस जि.सोलापुर येथे रवाना केले.सदर ठिकाणी जावुन ऊसाच्या फडात काम करत असलेल्या आरोपी यांना पकडण्यासाठी सापळा लावुन आरोपींना पकडुन जागीच जेरबंद केले.सदर आरोपीना पकडुन जामखेड पोलीस स्टेशन येथे आणले आहे.आरोपींना कोर्टात हजर करून मा.कोर्टाने आरोपींना 5 दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.
                                                 सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब , मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड ,पो.उप.नि.राजु थोरात ,पोना.अविनाश ढेरे, पोना.संग्राम जाधव ,पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ.विजय कोळी ,पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ.अरूण पवार ,पोकॉ.संदिप आजबे ,मपोकॉ.कोमल भुंबे यांनी केली आहे .सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.संजय लाटे व पोकॉ.सचिन पिरगळ हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here