पूर्ण ताकदनिशी निवडणूकीला सामोरे जाणार – देविदास खेडकर  मनसेची आढावा बैठक संपन्न

0
247
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – 
             जामखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकास्तरीय जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणूका संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
          बैठकीत जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणूका संपूर्ण ताकदनिशी एकमताने  लढवणार असे  ठरले.
      या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे जिल्हा संघटक सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष ( दक्षिण) देविदास खेडकर,जिल्हाध्यक्ष (उत्तर) बाबासाहेब शिंदे यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली.
           याप्रसंगी खेडकर म्हणाले,जामखेड तालुक्यातील विविध प्रश्न,मतदार संघातील अडचणी जाणून घेतल्या तसेच जामखेड तालुक्यातील गट,गण व नगर परिषदेचे वार्ड निहाय माहिती घेतली.आगामी निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पक्ष सर्वतोपरी मदत करणार आहे.
               यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जमकावळे, ता. अध्यक्ष प्रदीप टापरे, मनसे नेते पै. हवा ( दादा) सरनोबत , लक्ष्मण कानडे, ता. उपाध्यक्ष सनी सदाफुले, शहराध्यक्ष बालाजी भोसले, गणेश पवार , बिभीषण कदम, नितीन सपकाळ, पै. सोनू कदम , पै. बाला साठे पै.विशाल भांडवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरां पर्यंत पोहचून, संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार
सचिन डफळ
जिल्हा संघटक – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अ.नगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here