पांडू राजे भोसले यांनी उपोषणाचे हत्यार उचलताच प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य

0
244
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
शहरातील विविध समस्यांविषयी नगरपरिषद, महावितरण व बांधकाम यांना वेळोवेळी तोंडी सूचना देऊनही नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता तेव्हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले यांनी उपोषणाचे हत्यार उचलताच प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन मिळाले.
बीड रोड कॉर्नर ते नविन पोलिस स्टेशन या रस्त्याचे कामस अडथळा ठरणारे जीओचे अनाधिकृत पोल हटवणे, महावितरणचे खांब रस्त्यांचा बाजूला घेणे तसेच नगपरीषद प्रशासनाकडे असलेले विविध प्रश्नांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यातबाबत नगर परिषद, महावितरण व सार्वजनिक बांधकाम या तिन्ही विभागामार्फत योग्य ती अमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी काल दि. २५ फेब्रुवारी रोजी सुरू केलेले अमरण उपोषणाचे अंदोलन मागे घेतले.
     याबाबत नगरपरिषदमार्फत दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, जीओ कंपनीने केलेल्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने याबाबत कंपनीने केलेल्या कामाची चौकशी होऊन कारवाई  करणेबाबत जीओ कंपनीविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करणेत येणार असून  पुढील कारवाई करिता जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कार्यालयासही अहवाल पाठविण्यात येईल. .  शहरातील सर्व स्वच्छतागृहे व मुताऱ्या दुरुस्ती करण्याची कामे नगरपरिषदेने हाती घेतलेली आहेत. तर शहरात बाजारतळावर महिलांसाठी शौचालय काम मंजूर असून शॉपिंग कामासोबत शौचालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.
 कार्यालयीन कामाचे सोयीसाठी नागरिकांना भेटण्यासाठी ४ ते ५ अशी वेळ ठेवलेली आहे . अन्य वेळी नागरिक विभाग प्रमुखांना भेटू शकतील , नागरिकांना याबाबत केलेल्या मागणीनुसार हि वेळ दुपारी २.०० ते कार्यालय संपेपर्यंत ठेवण्यात येईल पूर्ण वेळ भेटीसाठीची मागणी मान्य करता येणार नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधीत मुददयांबाबत दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, शहरात होणारा मुख्य वर्दळीचा बीड कॉर्नर ते नवीन पोलिस स्टेशन रस्ता ( लवकरात लवकर व उत्कृष्ठ दर्जाचे झाले पाहिजे )  सदरचे काम IRC मानकाप्रमाणे सुरु त्याप्रमाणे गुणवत्ता पुर्वक पुर्ण करण्यात येणार आहे . तसेच सदर रस्त्याचे रुंदीकरणाच्या रुंदीमध्ये अडथळा येणा – या विजेचे खांब काढण्याचे काम २-३ दिवसात महावितरण विभाग , जामखेड यांचे मार्फत सुरु होणार आहे .
     महिलांसाठी जामखेड शहरात स्वच्छतागृह बांधणे बाबत नगर विकास विभागाकडुन जामखेड शहरात स्वच्छतागृह बांधणे हे काम मंजुर असुन या कामांची कार्यान्वीन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे . सदर कामासाठी बाजार तळ येथे जागा नगर परिषदेकडुन उपलब्ध करुन दिली नसल्यामुळे सदर काम अदयापपर्यंत हाती घेण्यात आलेले नाही . सदयस्थितीत नगर विकास विभागाकडुन जामखेड शहरात बाजारतळ येथे अंदाजीत किमंत ९ .०० कोटी इतकी किंमत असलेले शॉपिंग सेंटर काम मंजुर असुन सदर कामाच्या जवळ स्वच्छतागृह बांधणे हे काम करण्यात यावे असे नगर परिषदेकडुन मागणी केल्याप्रमाणे स्वच्छतागृह बांधणे असा कामाचा वाव शॉपिंग सेंटर या कामाचे अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात येणार आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया सदयस्थितीत प्रगतीत असुन ठेकेदार निश्चिती व कार्यारंभ आदेश झाल्यानंतर सदरचे काम तातडीने हाती घेवून पुर्ण करण्यात येईल.
अश्या पध्दतीने विविध मागण्याबाबत तिन्ही विभागामार्फत योग्य ती अमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी काल दि. २५ फेब्रुवारी रोजी सुरू केलेले अमरण उपोषणाचे अंदोलन मागे घेतले.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे,  प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, नय्युम शेख, प्रविण बोलभट, जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, महावितरणचे अभियंता युवराज परदेशी अदि पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here