Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या विकासावर बोलता न येणाऱ्यांनी दुसरा मुद्दा रेटणं हे राजकारण देशासाठी घातक –...

विकासावर बोलता न येणाऱ्यांनी दुसरा मुद्दा रेटणं हे राजकारण देशासाठी घातक – रोहित पवार

0
223
जामखेड न्युज – – – – 
देशातील विकासाबाबत काही बोलता येत नसेल तर या मुद्द्याला बगल देण्यासाठी तिसरा मुद्दा रेटणे कोणत्याही देशासाठी घातक असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते आणि आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचे परिणाम आता भारतामध्ये जाणवू लागले आहे. युक्रेनमध्ये २००० हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. यामध्ये १२०० विद्यार्थी मराठी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर विद्यार्थ्यांना भारतात आणावे अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरुन रोहित पवारांनी केंद्रावर टीका केली आहे. अहंकाराने पछाडलेल्या हेकेखोर सत्ताधीशाकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा स्वार्थी आणि सामान्य माणसाचं हित खड्ड्यात घालणारा असतो असे रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, अहंकाराने पछाडलेल्या हेकेखोर सत्ताधीशाकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा स्वार्थी आणि सामान्य माणसाचं हित खड्ड्यात घालणारा असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत असे रोहित पवार म्हणाले आहेत. या युद्धामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भावसुद्दा वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाचे आर्थिक परिणाम येत्या काही दिवसांमध्ये जाणवतील.
तेलाचा भडका उडून महागाई गगनाला भिडेल आणि सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. तसंच हा संघर्ष अधिक चिघळून त्याची व्याप्ती वाढत गेल्यास गरीब आणि विकासनशील देशांना त्यातून सावरणंही अशक्य होऊन बसेल. त्यामुळं हे युद्ध लवकर संपून शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा करूयात. हे युद्ध म्हणजे विकासाबाबत काही बोलता येत नसेल तर या मुद्द्याला बगल देण्यासाठी तिसराच मुद्दा पुढं रेटायचा मग भले तो देशासाठी हानिकारक असला तरी चालेल, असा हा प्रकार आहे. अशा प्रवृत्तीचं राजकारण हे कोणत्याही देशात होत असेल तर ते घातक आणि हानीकारक असतं असे रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवार यांनी रशियाच्या युद्दावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हेकेखोर सत्ताधीशाकडून घेण्यात आलेला निर्णय देशासाठी घातक असतो असा टोला केंद्राला लगावला आहे. देशात केंद्र सरकार ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणा विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरत आहे. यावरुन रोहित पवारांनी हा टोला लगावला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!